Thane: सोमवारी बऱ्याच लोकांची विकेट काढायची आहे, एकनाथ शिंदे यांचा इशारा
By जितेंद्र कालेकर | Updated: May 19, 2024 21:46 IST2024-05-19T21:45:46+5:302024-05-19T21:46:57+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: शनिवारी लोकसभा निवडणूकीचा प्रचार संपला. सोमवारी बऱ्याच लोकांची विकेट काढायची आहे. त्यामुळे आपण आज क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिलखुलासपणे सांगितले.

Thane: सोमवारी बऱ्याच लोकांची विकेट काढायची आहे, एकनाथ शिंदे यांचा इशारा
ठाणे - शनिवारी लोकसभा निवडणूकीचा प्रचार संपला. सोमवारी बऱ्याच लोकांची विकेट काढायची आहे. त्यामुळे आपण आज क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिलखुलासपणे सांगितले. मुंब्य्रातील शिवसेना शाखेला भेट दिल्यानंतर रविवारी मुख्यमंत्री शिंदे हे रिलॅक्स मूडमध्ये होते. त्याच दरम्यान त्यांनी ठाण्यात क्रिकेट खेळण्याचा आनंदही घेतला. त्यानंतर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांबरोबर त्यांनी मोबाईलमध्ये सेल्फीही घेतले.