दुपारी पक्षांतर, रात्री घरवापसी; शिंदेसेनेत प्रवेश केलेल्या नेते, पदाधिकाऱ्यांना परत भाजपात आणले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 10:19 IST2026-01-09T10:18:54+5:302026-01-09T10:19:04+5:30
सर्वच पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग-आऊटगोईंग सुरू आहे.

दुपारी पक्षांतर, रात्री घरवापसी; शिंदेसेनेत प्रवेश केलेल्या नेते, पदाधिकाऱ्यांना परत भाजपात आणले
निवडणुका जाहीर झाल्यापासून पक्षांतराचे सुरू झालेले वारे काही थांबायचे नाव घेत नाही. सर्वच पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग-आऊटगोईंग सुरू आहे. मीरा-भाईंदर महापालिका निवडणूक यंदा भाजप आणि शिंदेसेनेतील कलहांमुळे चर्चेची ठरत आहेत.
दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत असताना भाजपने अनेक माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांना तिकीट नाकारताच त्या नाराजांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. पक्षांतर करून सेनेचा भगवा ध्वज आणि प्रवेशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले खरे, पण भाजप आ. नरेंद्र मेहतांनी सेनेत गेलेल्या भाजपच्या नाराजांची मनधरणी करताच माजी नगरसेविका अनिता मुखर्जी, भाजप पदाधिकारी दीप भट यांनी काही तासांतच घरवापसी केली.
त्यामुळे सोशल मीडियावर शिंदेसेनेतील प्रवेशाच्या व्हायरल फोटोंवर कार्यकर्ते कमेंट करत नाही तोच या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा घरवापसी करून ते फोटो व्हायरल केल्याने नेमका कोणता झेंडा हाती घ्यावा, असा संभ्रम कार्यकर्त्यांत दिसत होता.