मीरा भाईंदरमध्ये चांगल्या सुविधांसह गुन्हेगारी रोखण्यावर काँग्रेसचा भर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 07:54 IST2026-01-07T07:54:30+5:302026-01-07T07:54:30+5:30
पालिकेत पुन्हा काँग्रेसला निवडून द्या असे सांगत मुझफ्फर यांनी आपली भूमिका मांडली.

मीरा भाईंदरमध्ये चांगल्या सुविधांसह गुन्हेगारी रोखण्यावर काँग्रेसचा भर
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड : मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वतीने जाहीरनाम्याचे प्रकाशन काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांनी मंगळवारी केले. मेट्रो, सूर्या पाणी योजना काँग्रेस शासन काळात मंजूर केलेल्या असताना भ्रष्ट भाजप महायुती सरकारने अनेक वर्षे ही कामे रखडवली. पालिकेत पुन्हा काँग्रेसला निवडून द्या असे सांगत मुझफ्फर यांनी आपली भूमिका मांडली.
जनहित, विकास आणि सुशासनावर आमचा भर आहे. जलपुरवठ्याबाबत कायमस्वरूपी उपाय, मेट्रो प्रकल्पाची सुरूवात, सक्षम परिवहन बस वाहतूक, खड्डेमुक्त रस्ते, टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी हटवणे, कचरा व्यवस्थापन, भूमिगत गटार योजना, भाजी मार्केट, पार्किंग सुविधा, आधुनिक आरोग्य सेवा व सार्वजनिक शौचालये यांना काँग्रेसने जाहीरनाम्यात प्राधान्य दिले आहे.
महिला सक्षमीकरण, क्रीडांगणांचा विकास यासह कायदा व सुव्यवस्था, सायबर गुन्हे यावर नियंत्रण, पर्यावरण संरक्षण व हरित शहर अभियान आदी आश्वासने काँग्रेसने जाहीरनाम्यात दिली आहेत. जनकल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणे. स्वच्छ, सुरक्षित, सुलभ आणि विकासशील महानगर बनवण्याचा संकल्प असल्याचे प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन म्हणाले. यावेळी प्रदेश निरीक्षक आनंद सिंग, जिल्हाध्यक्ष झुबैर इनामदार आदी उपस्थित होते.