Ambernath: अंबरनाथमध्ये महायुतीत तुफान राडा; नगरपालिकेबाहेर भाजप-शिंदेसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 13:43 IST2026-01-13T13:40:37+5:302026-01-13T13:43:14+5:30
Ambernath Shivsena-BJP Clash Video: अंबरनाथ नगरपरिषदेच्या बाहेर आज हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर भाजप आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. नगरपालिकेबाहेर झालेल्या या राड्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Ambernath: अंबरनाथमध्ये महायुतीत तुफान राडा; नगरपालिकेबाहेर भाजप-शिंदेसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले!
Ambernath Shivsena-BJP Rada: अंबरनाथ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिंदेसेना यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नगरपालिकेबाहेर जोरदार राडा झाला. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या हाणामारीचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
अंबरनाथमध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून आलेला असताना, उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र समीकरणे बदलली. या निवडणुकीत शिंदे गट आणि अजित पवार गटाने एकत्र येत बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सदा मामा पाटील यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली. या पराभवामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आणि संघर्षाची ठिणगी पडली. उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन आघाड्यांमध्ये थेट लढत झाली. भाजप प्रणित अंबरनाथ विकास आघाडीला २८ मते मिळाली. तर, अंबरनाथ शिवसेना महायुती विकास आघाडीला (शिंदेसेना + राष्ट्रवादी: अजित पवार) ३२ मते मिळाली.
दरम्यान, सदा मामा पाटील यांची उपनगराध्यक्षपदी निवड होताच पालिकेबाहेर दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. सदा मामा पाटील यांच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्याने शिंदेसेनेचे कार्यकर्ते संतापले. पाहता पाहता या घोषणाबाजीचे रूपांतर धक्काबुक्की आणि हाणामारीत झाले. नगरपरिषदेच्या गेटबाहेरच कार्यकर्त्यांनी एकमेकांशी वाद घालायला सुरुवात केली, ज्यामुळे परिसरात गोंधळ उडाला.
अंबरनाथ नगरपरिषदेच्या बाहेर आज हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर भाजप आणि शिंदेसेना यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. पालिकेबाहेर झालेल्या या राड्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.#Ambernathpic.twitter.com/QI44kIWTsa
— Lokmat (@lokmat) January 13, 2026
महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर
अंबरनाथमध्ये नगराध्यक्ष भाजपचा असताना उपनगराध्यक्ष निवडणुकीत शिंदेसेनेने भाजपला धक्का दिला आहे. यामुळे शहरातील भाजप आणि शिंदे गटामधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. या राड्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये ऑल इज वेल नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.