महाराष्ट्र निवडणूक निकाल : ठाण्यात महायुतीचाच बोलबाला; शिंदे, सरनाईकांनी राखला बालेकिल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 05:32 PM2019-10-24T17:32:03+5:302019-10-24T17:48:39+5:30

Maharashtra Election Result 2019 : ठाण्यातील चारही मतदारसंघात विद्यमान आमदारांचा विजय झाला आहे. 

Maharashtra Vidhan Sabha Result Maharashtra Election Winner List in Thane | महाराष्ट्र निवडणूक निकाल : ठाण्यात महायुतीचाच बोलबाला; शिंदे, सरनाईकांनी राखला बालेकिल्ला

महाराष्ट्र निवडणूक निकाल : ठाण्यात महायुतीचाच बोलबाला; शिंदे, सरनाईकांनी राखला बालेकिल्ला

googlenewsNext

ठाणे - ठाण्याच्या निकालाकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या. ठाण्यातील चारही मतदारसंघात विद्यमान आमदारांचा विजय झाला आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदार संघावर पुन्हा एकदा शिवसेनेने आपल्या विजयाची मोहोर उमटवली आहे. शिंदे यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. ओवळा माजीवडा मतदार संघातून शिवसेनेचे प्रताप सरनाईक, कळवा-मुंब्रा येथून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड तर ठाणे शहरमधून भाजपाचे संजय केळकर विजयी झाले आहेत. 

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पहिल्या फेरीपासूनच मतांमध्ये आघाडी घेत आपला गड कायम राखला आहे. शिंदे यांनी 1 लाख 13 हजार 4 मते मिळवून विजयाची हॅटट्रिक साधली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणेच एकतर्फी निकाल लागल्यामुळे पुन्हा कोपरी पाचपाखाडी मतदारसंघावर भगवा फडकविला आहे. या मतदार संघात काँग्रेसचे संजय घाडीगावकर आणि मनसेचे महेश कदम यानी शिंदे यांना आव्हान दिले होते. हे त्यात घाडीगावकर यांनी प्रचारात क्लस्टरचा मुद्दा घेऊन शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो अपयशी ठरल्याचे या निकालावरुन स्पष्ट झाले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांचा पराभव केला आहे. ओवळा माजीवडा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांना 1,17, 289 मतदारांनी मतांच्या रुपात मतदान केले. त्यांनी काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांचा 83,772 मतांनी पराभव करत, विजयाची हॅटट्रिक साधली. सुरुवातीपासूनच सरनाईकांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत, त्यांनी आपला गड राखला. या विजेयाचे श्रेय त्यांनी मतदारसंघातील शिवसैनिकांना दिले.

सक्षम विरोधी पक्ष म्हणून संधी द्या, असं आवाहन करणाऱ्या मनसेला केवळ एका जागेवर यश मिळालं आहे. कल्याण ग्रामीणमध्ये मनसेच्या राजू पाटील यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेना आणि मनसेमध्ये चुरशीचा संघर्ष पाहायला मिळाला. अखेर यामध्ये राजू पाटील यांनी बाजी मारली आणि मनसेला भोपळा फोडण्यात यश आलं. सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच राजू पाटील यांनी आघाडी घेतली होती. शिवसेनेच्या रमेश म्हात्रेंनी त्यांना कडवी टक्कर दिली. अनेकदा राजू पाटील आणि रमेश म्हात्रे यांच्या मतांमध्ये अवघ्या काही शे मतांचा फरक दिसत होता. अखेर राजू पाटील यांनी बाजी मारली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मनसेनं पहिल्या विजयाची नोंद केली. मनसेला कल्याण ग्रामीणमध्ये यश मिळेल, अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली होती.

भाजपा

मंदा म्हात्रे ( बेलापूर )

गणेश नाईक ( ऐरोली )

संजय केळकर ( ठाणे शहर )

गणपत गायकवाड़ ( कल्याण पूर्व )

महेश चौगुले ( भिवंडी पश्चिम )

किसन कथोरे ( मुरबाड )

रविंद्र चव्हाण ( डोंबिवली )

कुमार आयलानी ( उल्हासनगर )

शिवसेना

एकनाथ शिंदे (कोपरी पाचपाखडी )

प्रताप सरनाईक ( ओवला माजीवडा )

शांताराम मोरे ( भिवंडी ग्रामीण )

विश्वनाथ भोईर ( कल्याण पश्चिम )

बालाजी किनिकर ( अंबरनाथ )

राष्ट्रवादी

जितेंद्र आव्हाड ( कळवा-मुंब्रा )

दौलत दरोडा (शहापूर )

मनसे

प्रमोद पाटील ( कल्याण ग्रामीण )

समाजवादी

रहिस शेख ( भिवंडी पूर्व )

अपक्ष

गीता जैन ( मीरा भाईंदर )


 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Result Maharashtra Election Winner List in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.