Maharashtra Vidhan Sabha Result Kelkar Sanjay Mukund of BJP leads, Avinash Jadhav of MNS trails | महाराष्ट्र निवडणूक निकाल : ठाण्यात कोण आघाडीवर तर कोण पिछाडीवर?
महाराष्ट्र निवडणूक निकाल : ठाण्यात कोण आघाडीवर तर कोण पिछाडीवर?

ठाणे - विधानसभेसाठी मतदान पार पडले ठाण्यातील चार मतदारसंघातील निकालाकडे आता सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. ठाण्यातील चारही मतदारसंघात विद्यमान आमदारांचे अस्तित्व पणाला लागले आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांचा समावेश आहे. तर ठाणे शहरमध्ये भाजपाचे संजय केळकर यांच्यासाठी ही लढत अतिशय निर्णायक ठरली आहे. 

पुणे, नाशकात एकही जागा न लढवणाऱ्या, युतीत पहिल्यांदाच भाजपापेक्षा कमी जागा लढवणाऱ्या शिवसेनेला मुंबई, ठाण्याने मोठा हात दिला आहे. राज्यात मोठा भाऊ असलेला भाजपा मुंबई, ठाण्यात मात्र छोटा भाऊ ठरताना दिसत आहे. मतमोजणीला सुरुवात होताच शिवसेनेने मुंबई, ठाण्यात आघाडी घेतली आहे. सध्या शिवसेना राज्यात 70 पेक्षा अधिक जागांवर पुढे आहे. यामध्ये मुंबई, ठाण्याचा मोठा वाटा आहे. ठाण्यात शिवसेना तब्बल 20 जागांवर पुढे आहे. तर भाजपा 7 मतदारसंघांत आघाडीवर आहे. मागील निवडणुकीत ठाण्यात भाजपाने 7, तर शिवसेनेने 15 जागा जिंकल्या होत्या. 

कोण आघाडीवर तर कोण पिछाडीवर?

ठाणे 

संजय केळकर (भाजप) - आघाडीवर
अविनाश जाधव (मनसे) - पिछाडीवर

कळवा मुंब्रा 

जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी) - आघाडीवर
दीपाली सय्यद (शिवसेना) - पिछाडीवर

कोपरी पाचपाखाडी 

एकनाथ शिंदे (शिवसेना) - आघाडीवर

ओवळा माजिवडा 

प्रताप सरनाईक (शिवसेना) - आघाडीवर

कल्याण ग्रामीण 

राजू पाटील (मनसे) - पिछाडीवर

रमेश म्हात्रे (शिवसेना) - आघाडीवर

कल्याण पश्चिम 

विश्वनाथ भोईर (शिवसेना) - आघाडीवर

प्रकाश भोईर (मनसे) - पिछाडीवर

अंबरनाथ 

डॉ. बालाजी किणीकर (शिवसेना) - आघाडीवर

रोहित साळवे (काँग्रेस) - पिछाडीवर

भिवंडी पूर्व

रुपेश म्हात्रे 

भिवंडी पश्चिम 

महेश चौघुले

ऐरोली 

गणेश नाईक (भाजप) -  आघाडीवर

गणेश शिंदे  (राष्ट्रवादी) - पिछाडीवर

बेलापूर

मंदा म्हात्रे (भाजप) - आघाडीवर

अशोक गावडे (राष्ट्रवादी) - पिछाडीवर

उल्हासनगर 

कुमार आयलानी (भाजप) - आघाडीवर

ज्योती कलानी (राष्ट्रवादी) - पिछाडीवर

डोंबिवली  

रवींद्र चव्हाण (भाजप) -  आघाडीवर

मंदार हळबे (मनसे) - पिछाडीवर

विधानसभा निवडणुकीच्या आज लागणाऱ्या निकालांची अनेकांना उत्कंठा लागून राहिली आहे. निवडणुकीचा कल हाती येण्यास सुरुवात झाली असून, भाजपा आतापर्यंत 100 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे, तर राष्ट्रवादी 50 जागांवर पुढे आहे. शिवसेना 70, काँग्रेस 42 जागांवर आघाडीवर आहे. बारामती, कर्जत-जामखेड, वरळी, सातारा, परळी, कोथरूड, कणकवली अशा मतदारसंघांत चुरस असून, लवकरच त्याचा निकाल हाती येणार आहे. महायुती विरुद्ध महाआघाडी या रणसंग्रामात कोणाला कौल मिळतो, यावर पुढील पाच वर्षे सत्ता कोणाची ठरणार आहे. 

 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Result Kelkar Sanjay Mukund of BJP leads, Avinash Jadhav of MNS trails

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.