५ दिवसांच्या ७ हजार 32 बाप्पांचे कल्याण डोंबिवलीत शांततेत विसर्जन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 06:16 PM2020-08-27T18:16:36+5:302020-08-27T18:16:53+5:30

सर्व प्रभागात नियमांचे पालन

Immersion of 7 thousand 32 Bappas in Dombivali in 5 days | ५ दिवसांच्या ७ हजार 32 बाप्पांचे कल्याण डोंबिवलीत शांततेत विसर्जन

५ दिवसांच्या ७ हजार 32 बाप्पांचे कल्याण डोंबिवलीत शांततेत विसर्जन

Next

डोंबिवली: ५ दिवसांच्या गणपतींचे बुधवारी कल्याण डोंबिवलीतील गणेशघाटांवर शांततेच्या वातावरणात आणि मनपाने ठरवून दिलेल्या नियमांनूसार सर्व प्रभागांमध्ये सुमारे ७ हजार 32 बाप्पांचे  विसर्जन झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोठेही गर्दी होणार नाही याची काळजी घेत मनपा, ठिकठिकाणची सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या स्वयंसेवकांनी विसर्जन केले. येणा-या भाविकांनाही नियमांची माहिती देत त्यानंतरच मूर्ती विसर्जनासाठी घेण्यात येत होती.मूर्ती स्वयंसेवकांकडे देतांना देखील फिजीकल डिस्टन्स पाळण्यात आले होते. सार्वजनिक असो अथवा घरगुती गणपती असो दोन,तीन भक्तांखेरीज कोणालाही विसर्जन घाटाच्या आधी ठरवून दिलेल्या अंतरावरील टेबल जवळ प्रवेशाला मनाई ठेवण्यात आली होती.

एका वेळी विसर्जन व्यवस्थेवरून सात ते दहा मूर्ती, दोन मोठ्या मूर्ती विशिष्ठ अंतरावर घेऊन जात  त्यांचे विसर्जन करण्यात आले होते. सर्व भक्तांना कुटुंबियांसमवेर लांबून ते दिसत असल्याने त्यांनाही समाधान असल्याचे नीदर्शनास आले. विसर्जनादरम्यान प्रत्यक्ष पाण्यामध्ये मूर्ती नेतांना निर्माल्य काढुन ठेवण्यात आले होते. त्या आधी आरती करण्यात येत असल्याने गणेश घाटावर भक्तीमय वातावरण झाले होते.  विसर्जन आपल्या दारी या संकल्पने अंतर्गत महापालिका क्षेत्रातील ४९१ गणेश मुर्ती स्विकारण्यात येवून त्यांचे विसर्जन महापालिकेमार्फत करण्यात आले. या व्यतिरिक्त महापालिकेच्या सर्व प्रभागात असलेल्या तलाव, कृत्रिम तलाव तसेच विसर्जन घाट येथे मिळून सुमारे ७ हजार गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले.

या विसर्जनासाठी महापालिकेने कल्याण पूर्व येथे गावदेवी मंदिर, तिसगाव येथे, कोळसेवाडी पोलीस स्टेशनजवळ, चक्की नाका वखारी जवळ, खडेगोळवली त्याचप्रमाणे कल्याण पश्चिमेला  अनंत रिजन्सी, पारनाका तसेच विदयापिठ परिसर येथे कृत्रिम तलावाची व्यवस्था केली होती. डोंबिवलीतही पंचायत बावडी विहीर, नेहरु मैदान, अयोध्या नगरी रोड, शिवम हॉस्पिटल, टिळक विद्या मंदिर शाळा, न्यू आयरे रोड, प्रगती कॉलेज, कस्तुरी प्लाझा, आनंद नगर गार्डन, भागशाळा मैदान, मिलाप नगर, पी. अँड टी. कॉलनी आदी विसर्जन सुविधा देण्यात आली होती.
गणेश विसर्जन मार्गावरील चौकांमध्ये सुरक्षिततेसाठी महापालिकेने २७ महत्वाच्या ठिकाणी १२५ सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविलेले आहेत. तसेच २० महत्वाच्या विसर्जन स्थळावर अग्निशमन विभागामार्फत स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रभागातील विसर्जन स्थळी संबंधित प्रभागक्षेत्र अधिकारी यांनी उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतल्याचे सांगण्यात आले.

डोंबिवलीत चिंचोळयाचा पाडा येथे मनपाच्या स्थायी समितीचे सभापती विकास म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली खाडीवरील गणेशघाटावर विसर्जनाची सोय करण्यात आली होती. तेथील एका गणेशोत्सव मंडळाने त्याची जबाबदारी घेतली होती. त्या मंडळाचे काही स्वयंसेवक स्वत: सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी पुढे आले होते, त्यांनी आलेल्या भक्तांकडून फिजीकल डिस्टन्सचे नियम पाळून शिस्तबद्ध पद्धतीने मूर्ती घेऊन त्यांचे विसर्जन केले. म्हात्रे देखील त्यावेळी उपस्थित होते, नियमांचे उल्लंघन होणार नाही, कोणाला त्रास होणार नाही याबाबतच्या सूचना त्यांनीही स्वयंसेवकांना दिल्या, तसेच नागरिकांना नियमांचे पालन करून उत्सावाचा आनंद लुटण्याचे आवाहन केले. रात्री ९ पर्यंत विसर्जन सुरु होते. 

Web Title: Immersion of 7 thousand 32 Bappas in Dombivali in 5 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.