उल्हासनगरच्या रस्त्यावरून योगी गेले तर आयलानीसाठी मतच मागणार नाही; गंगोत्रींचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 19:17 IST2024-11-12T19:17:14+5:302024-11-12T19:17:41+5:30
- सदानंद नाईक उल्हासनगर : शहरातील रस्त्यातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ता्फा गेल्यास, ते रस्त्याची दुरावस्था बघून आयलानी यांच्या ...

उल्हासनगरच्या रस्त्यावरून योगी गेले तर आयलानीसाठी मतच मागणार नाही; गंगोत्रींचा टोला
- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील रस्त्यातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ता्फा गेल्यास, ते रस्त्याची दुरावस्था बघून आयलानी यांच्या साठी मते मागणार नाही. अशी उपरोधिक टीका भारत गंगोत्री यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
उल्हासनगरातील रस्ते खोदून गटारीचे पाईप टाकण्यात येत असून खोदलेले रस्ते दुरुस्त न केल्याने, रस्त्याची दुरावस्था झाली. योगी आदित्यनाथ हे आयलानी यांच्या प्रचार सभेसाठी बुधवारी अंटेलिया खुल्या मैदानात येत आहेत. त्यांचा ता्फा चुकून शहरातील कोणत्याही रस्त्यावरून गेल्यास, रस्त्याची दुरावस्था बघून कुमार आयलानी यांच्यासाठी मुख्यमंत्री योगी मते मागणार नाही. असा उपरोधिक टोला भारत गंगोत्री यांनी आयलानी यांना पत्रकार परिषद घेऊन मारला आहे.
हजारो कोटीची विकास कामे कुठे झाली. याचे उत्तर स्थानिक आमदार का देत नाही? असा प्रश्नही गंगोत्री यांनी केला. गंगोत्री निवडणूक रिंगणात उतरल्याने कलानी व आयलानी यांच्या टेन्शन मध्ये वाढ झाल्याचे चित्र शहरात आहे.