'मी बजावणार मतदानाचा हक्क' म्हणत पाेतराजचा ठेंगा दावून प्रतिसाद!

By सुरेश लोखंडे | Published: April 23, 2024 04:28 PM2024-04-23T16:28:03+5:302024-04-23T16:29:16+5:30

मतदान वाढवण्यासाठी मतदारसंघाच्या स्वीप कार्यक्रमाची अमंलबजावणी ठिकठिकाणी जाेर धरत आहे

I will exercise my right to vote so Potraj shows thumps up as he joins Election campaign | 'मी बजावणार मतदानाचा हक्क' म्हणत पाेतराजचा ठेंगा दावून प्रतिसाद!

'मी बजावणार मतदानाचा हक्क' म्हणत पाेतराजचा ठेंगा दावून प्रतिसाद!

सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी ठाणे विधानसभा निवडणूक कार्यालयाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात आता पोतराजही सहभागी झाला असून आपल्या कलेद्वारे नागरिकांमध्ये मतदान करण्याचे आवाहन करीत असताना ‘मी बजावणार मतदानाचा हक्क’ असे म्हणून अंगठ्याचा ठेंगा दाखवत ताे इतरांनाही प्राेत्साहित करीत आहे.

मतदान वाढवण्यासाठी मतदारसंघाच्या स्वीप कार्यक्रमाची अमंलबजावणी ठिकठिकाणी जाेर धरत आहे. प्रत्येक सज्ञान नागरिकाला भारतीय संविधानाने मतदान करण्याचा समान हक्क प्रदान केलेला आहे. कोणताच घटक मतदानापासून वंचित राहणार नाही, याची दखल घेऊन त्याच्यापर्यंत मतदान जनजागृती केली जात आहे.

ठाणे शहरात मतदान जनजागृती कार्यक्रम सुरू असताना अचानकपणे तेथे पोतराजचे आगमन झाले. त्यांनी मतदान जनजागृतीचे फलक पाहिले, घोषणा ऐकल्या. पोतराजाने स्वतःहून स्वीप पथकास म्हणला, की आपण सर्व लोकशाही बळकट करण्यासाठी व मतदान टक्का वाढण्या करीता सक्रीय सहभाग घेत आहाेत. मी एक पाेतराज देवीची उपासना करणारा लोकसंस्कृतीचा उपासक आहे. पोटासाठी मी आसूड घेऊन नाचतो, पण मी आपल्या देशासाठी मतदान करणार, मतदान माझा अधिकार आहे. मी मतदानाचा हक्क बजावणार, आपणाही मतदान करा, असे त्याने उपस्थिताना आवाहन केले. यावेळी पोतराज यांनी त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून मतदानाचे महत्व पटवून दिले. पोटाचे खळगे भरण्यासाठी तो पोतराज अधुनिक भारतात आजही स्वतःच्या अंगावर आसुडाचे फटके ओढत होता आणि एकीकडे मतदान माझा अधिकार आहे, असे म्हणत तो गाण्यातून सर्वाना मतदान करण्याचे आवाहन करत होता. हा मतदान जनजागृती कार्यक्रम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला आहे.

Web Title: I will exercise my right to vote so Potraj shows thumps up as he joins Election campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.