मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 22:01 IST2026-01-09T22:01:11+5:302026-01-09T22:01:52+5:30
मुंबई रून आता पर्याय म्हणून दहिसर - भाईंदरपर्यंत कोस्टल मार्ग तयार केला जात आहे. येत्या ३ ते ४ वर्षात हा रास्ता पूर्ण होईल. व मुंबईला २० ते ३० मिनिटात पोहचाल. कोस्टल मार्ग वरून विरार - गुजरात जायला पण सोपे होणार आहे असं त्यांनी सांगितले.

मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
धीरज परब
मीरारोड - महापालिका निवडून आल्यानंतर आमदार, महापौर, नगरसेवकांना तुम्ही किती काम केले हे मी विचारणार नाही. तर किती लाडक्या बहिणींना लखपती बनवले ते विचारणार असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाईंदर येथील भाजपच्या प्रचार सभेत केले. शहरातील विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार आणि बांधण्यासाठी गरज पडल्यास निधी पण देणार असे मुख्यमंत्री यांनी जाहीर केले.
भाईंदरच्या बाळासाहेब ठाकरे मैदानात भाजपाच्या प्रचार सभेसाठी शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार गोपाळ शेट्टी, भोजपुरी कलाकार व खासदार दिनेशलाल यादव, पूनम महाजन, आमदार नरेंद्र मेहता सह अनेक भाजपा पदाधिकारी, निवडणूक उमेदवार उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, २०१७ सालच्या महापालिका निवडणुक वेळी जाहीरसभेत लोकांना आवाहन केले होते आणि लोकांनी भाजपाच्या दोन तृतीयांश नगरसेवक निवडून दिले. तेव्हा शहराला विकासाच्या मार्गावर नेण्याचे काम केले. पिण्याच्या पाण्याची समस्या सूर्या धरणच्या पहिला टप्पा ७५ दशलक्ष लिटर पाणी आणले. दुसरा टप्पातील अडचणी दूर केल्या असून या वर्षीच रोज पाणी मिळेल. जानेवारी अखेरीस मीरारोड मेट्रो सुरु होईल. निवडणूक झाल्यावर डोंगरी येथील कारशेड रद्द करणार असं त्यांनी सांगितले.
तसेच काँग्रेस सरकारने ११ वर्षात केवळ ११ किमी मेट्रो केली. आपण एमएमआर क्षेत्रात मेट्रोचे ४७५ किमीचे नेटवर्क तयार केले. .लोकल, मेट्रो व बेस्ट चे तिकीट साठी एकीकरण करत वन ऍप केले आहे. सर्व महापालिका क्षेत्रात मेट्रो, लोकल व बस हि एका तिकिटावर प्रवास करता येणार. पश्चिम महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या मोठी असून ३ - ३ तास जाम असतो. ६० टक्के वाहतूक ह्या मार्गावर असते. मुंबई रून आता पर्याय म्हणून दहिसर - भाईंदरपर्यंत कोस्टल मार्ग तयार केला जात असून काही परवानगी सर्वोच्च न्यायालयातून घेतल्या आहेत. येत्या ३ ते ४ वर्षात हा रास्ता पूर्ण होईल. व मुंबईला २० ते ३० मिनिटात पोहचाल. कोस्टल मार्ग वरून विरार - गुजरात जायला पण सोपे होणार आहे असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, जुन्या इमारतींचा प्रश्न सोडवण्यासाठी क्लस्टर योजनेत काय काय बदल हवे ते सांगा. मग ते अंतिम करू. भीमसेन जोशी सरकारी रुग्णालय मल्टीस्पेशालिटी करणार. पार्किंग प्लाझाची गरज, भटक्या प्राण्यांसाठी रुग्णालय, उत्तनच्या मच्छीमारांची मासळी बाजार व प्रॉपर्टी कार्डची मागणी, कत्तलखाना आरक्षण आदी मुद्यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी उल्लेख केला. झोपडपट्टी पुनर्विकास करायचा असून मिठागर जागेतील झोपडपट्टी जागा राज्य सरकारला द्या व तिकडे प्रधानमंत्री आवास योजना नुसार त्यांचे पुनर्वसन करणार. इकडे महापौर बसवाल तसेच ह्या मिठागरच्या जागा तुमच्या कडे देऊ. महात्मा फुले योजनेत आता ५ लाख वरून ३५ लाख पर्यंतचे शस्त्रक्रिया, उपचार करणार. शहरात अश्या योजना असलेल्या रुग्णालयांची संख्या वाढवणार असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.