नव्यापेक्षा जुन्या जाणत्यांवर भर! ७० टक्के माजी नगरसेवक निवडणूक रिंगणात; शिंदेसेनेतील उमेदवार अधिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 15:55 IST2026-01-09T15:54:59+5:302026-01-09T15:55:22+5:30
१३१ नगरसेवक निवडून जाणार असले तरीही मागील निवडणुकीतील ७० टक्के नगरसेवक पुन्हा आपले नशीब अजमावत आहेत. यात शिंदेसेनेतील माजी नगरेसवकांची संख्या अधिक असून त्या खालोखाल भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार) तील माजी नगरसेवकांचा समावेश आहे.

नव्यापेक्षा जुन्या जाणत्यांवर भर! ७० टक्के माजी नगरसेवक निवडणूक रिंगणात; शिंदेसेनेतील उमेदवार अधिक
ठाणे : ठाणे पालिका निवडणुकीत यंदा ६४९ उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्यक्षात पालिकेवर १३१ उमेदवार निवडून जाणार आहेत. असे असले तरी या निवडणुकीत मागील निवडणुकीत निवडून आलेले सुमारे ७० टक्के माजी नगरसेवक पुन्हा रिंगणात उतरले आहेत, तर १० टक्के माजी नगरसेवक हे त्या आधीच्या निवडणुकीत निवडून आले होते. त्यामुळे २० टक्के नव्या चेहऱ्यांना किंवा घरातील सदस्यांनाच संधी दिली आहे.
१३१ नगरसेवक निवडून जाणार असले तरीही मागील निवडणुकीतील ७० टक्के नगरसेवक पुन्हा आपले नशीब अजमावत आहेत. यात शिंदेसेनेतील माजी नगरेसवकांची संख्या अधिक असून त्या खालोखाल भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार) तील माजी नगरसेवकांचा समावेश आहे.
हे आहेत माजी नगरसेवक
यात नारायण पवार, मनोहर डुंबरे, संजय भोईर, भूषण भोईर, देवराम भोईर, मिलिंद पाटील, प्रमिला केणी, नजीब मुल्ला, दिलीप बारटक्के, स्नेहा आंब्रे, उषा भोईर, पद्मा भगत, अर्चना मणेरा, मृणाल पेंडसे, संजय वाघुले, सुनेश जोशी आदींसह इतर महत्त्वाच्या चेहऱ्यांचा समावेश आहे.
दोन माजी महापौरही आजमावताहेत नशीब दुसरीकडे, या निवडणुकीत माजी महापौर अशोक वैती, मीनाक्षी शिंदे हे माजी महापौर आपले नशीब पुन्हा आजमावत आहेत.
यांनी जवळजवळ दोन ते चार टर्म नगरसेवक पद भूषविले आहे. याशिवाय माजी महापौर हरिश्चंद्र पाटील यांची पत्नी कल्पना पाटील यांच्यासह उपमहापौरांची पत्नी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.
एकूणच, ठाणे पालिका निवडणुकीत यंदा सुमारे ७५ च्या आसपास माजी नगरसेवक पुन्हा एकदा आपले नशीब अजमावत आहेत. त्यातील आता पुन्हा किती उमेदवार निवडून येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कल्याण-डोंबिवलीत बहुतांश नेत्यांच्या घरातच तिकिटे -
कल्याण : कल्याण - डाेंबिवली पालिका निवडणुकीत ४९०पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांपैकी ६०पेक्षा जास्त माजी नगरसेवकांना भाजप, शिंदेसेनेकडून उमेदवारी दिली गेली आहे. मात्र, त्यांच्या विरोधात काही ठिकाणी बंडखोरांनी आव्हान उभे केले आहे.शिंदेसेनेकडून आ. विश्वनाथ भोईर यांच्या पत्नी वैशाली यांना उमेदवारी दिली गेली नाही. त्यांच्या बदल्यात भोईर यांचे भाऊ आणि माजी नगरसेवक प्रभुनाथ भोईर यांच्या पत्नीला उमेदवारी दिली, तर त्यांचे दुसरे भाऊ जयवंत भोईर हे पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत.
त्याचबरोबर हर्षाली थवील, शालिनी वायले, नमिता पाटील, मयुर पाटील, गणेश कोट, नीलिमा पाटील, वैजयंती घाेलप, संजय पाटील, मल्लेश शेट्टी, नवीन गवळी, नीलेश शिंदे, दीपाली पाटील, महेश गायकवाड, पूजा म्हात्रे, रमेश जाधव, माधुरी काळे, ज्योती मराठे, सचिन पाेटे, विकास म्हात्रे,
कविता म्हात्रे, कुणाल पाटील यांना उमेदवारी दिली. माजी महापौर दिवंगत राजेंद्र देवळेकर यांच्या पत्नी अनघा देवळेकर, तर दिवंगत नगरसेवक प्रकाश पेणकर यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली आहे.
६४९ उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्यक्षात पालिकेवर १३१ उमेदवार निवडून जाणार आहेत. त्यात ७० टक्के माजी नगरसेवक पुन्हा नशीब आजमावत आहेत.