मतदान केंद्रांवर सकाळीच मतदारांची गर्दी; लोकमान्य नगर भागात मतदान यंत्र बंद

By अजित मांडके | Published: May 20, 2024 09:17 AM2024-05-20T09:17:03+5:302024-05-20T09:18:47+5:30

अन्य एका भागातही मतदान यंत्र बंद होते.

crowd of voters at polling stations early in the morning voting machine closed in lokmanya nagar area in thane | मतदान केंद्रांवर सकाळीच मतदारांची गर्दी; लोकमान्य नगर भागात मतदान यंत्र बंद

मतदान केंद्रांवर सकाळीच मतदारांची गर्दी; लोकमान्य नगर भागात मतदान यंत्र बंद

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून विविध भागात सुरळीतपणे सुरुवात झाले. मात्र लोकमान्य नगर या भागात तासभर मतदान यंत्र बंद असल्याची तक्रार नागरिकांनी केली. तसेच अन्य एका भागातही मतदान यंत्र बंद होते.

मात्र ते पंधरा मिनिटात सुरू करण्यात आले. त्यातही घोडबंदर भागात अनेक गृह संकलातील नागरिक सकाळच्या सत्रात मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी बाहेर आल्याचे सुखद चित्र दिसून आले. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येणाऱ्या नागरिकाला मतदान करतेवेळी किमान दोन मिनिटांचा अवधी जात होता. त्यामुळे मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा असे चित्र दिसत होते. घोडबंदर भागातील हिरानंदनी इस्टेट असेल मानपाडा,वाघबीळ,कासारवडवली, ओवळा  या भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सकाळच्या सत्रात बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला.

Web Title: crowd of voters at polling stations early in the morning voting machine closed in lokmanya nagar area in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.