युतीचे जुळल्याचे जाहीर होण्यापूर्वीच उमेदवार ‘बोहल्यावर’; निर्णय वरिष्ठांकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 11:06 IST2025-12-29T11:05:12+5:302025-12-29T11:06:09+5:30
निवडणूक जाहीर झाल्यापासून ठाण्यात शिंदेसेना आणि भाजप यांच्या नेत्यांत चार बैठका झाल्या.

युतीचे जुळल्याचे जाहीर होण्यापूर्वीच उमेदवार ‘बोहल्यावर’; निर्णय वरिष्ठांकडे
ठाणे : शिंदेसेना-भाजप युतीचे जागा वाटप अडले असताना सध्या दोन्ही पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी ‘चला फॉर्म भरायला’, अशी साद घातली असून, सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत. याबाबतच्या पोस्टरवर दोन्ही पक्षांकडून नेत्यांचे फोटाे टाकले आहेत.
निवडणूक जाहीर झाल्यापासून ठाण्यात शिंदेसेना आणि भाजप यांच्या नेत्यांत चार बैठका झाल्या. या चारही बैठकांत निवडणुका युतीत लढल्या जातील, असे दोन्ही पक्षातील नेत्यांनी जाहीरपणे सांगितले. परंतु, जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटू शकलेला नाही. काही जागांवरून मतभेद असल्याचे सांगण्यात येते. शिंदेसेनेच्या काही जागांवर भाजपने थेट दावा केला. दिव्यात भाजपने जागा मागितल्या. घोडबंदर, वागळे, कळवा आदी भागातही भाजपने जागा मागितल्या आहेत. परंतु, या जागांचा निर्णय श्रेष्ठींवर सोपवल्याची माहिती त्यांच्या नेत्यांनी दिली.
निर्णय वरिष्ठांकडे
आमची युती झाली असून काही जागांचा शिल्लक राहिलेला तिढा वरिष्ठांकडे सोपवला आहे. ते त्यावर निर्णय घेतील, असे भाजप ठाणे निवडणूक प्रभारी निरंजन डावखरे यांनी सांगितले. तर, आमची युती झालेली आहे, काही जागांवर तिढा असला तरी तो जवळ जवळ संपुष्टात आलेला आहे, असे शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के
यांनी सांगितले.