भिवंडीत राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिकांचा बॉम्बे धाब्यावर हल्ला,नामफलक फाडून व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 05:21 IST2026-01-09T05:21:13+5:302026-01-09T05:21:45+5:30
राज ठाकरे हे कल्याणहून प्रचार संपवून भिवंडी मार्गे ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांची नजर ठाणे भिवंडी सीमेवरील खारीगाव खाडीच्या ब्रिज नजीक असलेला "बॉम्बे ढाब्या" वर गेली.

भिवंडीत राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिकांचा बॉम्बे धाब्यावर हल्ला,नामफलक फाडून व्यक्त केला संताप
लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: सध्या महानगरपालिका निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे.प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते ठिकठिकाणी भेटी देत आहेत.गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे हे कल्याणहून प्रचार संपवून भिवंडी मार्गे ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांची नजर ठाणे भिवंडी सीमेवरील खारीगाव खाडीच्या ब्रिज नजीक असलेला "बॉम्बे ढाब्या" वर गेली.
जेथे अजूनही बॉम्बे ढाबा हे नाव असल्याचे आपल्या सोबत असलेलेल ठाणे व पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्या लक्षात ही बाब आणून दिली. त्यांनी दिलेल्या आदेशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ठाणे जिल्हा प्रमुख परेश चौधरी आपल्या सहकाऱ्यांसह बॉम्बे ढाबा येथे दाखल होत. ढाबा व्यवस्थापकास येथील नाव तत्काळ बदलण्याच्या,येथील विद्युत साईन बोर्ड बंद करण्यास सांगून न थांबता मनसे सैनिकांनी येथील नामफलक फाडून आपला संताप व्यक्त केला.