भिवंडी महानगरपालिकेचा १,१७९ कोटींचा अर्थसंकल्प; विशेष महासभेस मोजकेच नगरसेवक हजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 11:24 IST2026-03-25T11:24:39+5:302026-03-25T11:24:39+5:30

विशेष चर्चा होणार

bhiwandi municipal corporation budget of Rs 1179 crore only a few corporators attended the special general meeting | भिवंडी महानगरपालिकेचा १,१७९ कोटींचा अर्थसंकल्प; विशेष महासभेस मोजकेच नगरसेवक हजर

भिवंडी महानगरपालिकेचा १,१७९ कोटींचा अर्थसंकल्प; विशेष महासभेस मोजकेच नगरसेवक हजर

लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : भिवंडी महापालिकेचा १,१७९ कोटी १० लाख ९७ हजार रुपयांचा २०२६ - २०२७ चा अर्थसंकल्प मनपा आयुक्त अनमोल सागर यांनी मंगळवारी विशेष महासभेत महापौर नारायण चौधरी यांना सादर केला.  विशेष म्हणजे या विशेष महासभेस काही मोजकेच नगरसेवक उपस्थित होते.

आयुक्तांनी ठळक तरतुदी असलेल्या प्रस्तावनेचे वाचन करत  २० मिनिटांमध्येच विशेष सभा तहकूब केली. ३० मार्चला अर्थसंकल्पावर विशेष  चर्चेसाठी महासभा होणार असल्याचे महापौर चौधरी म्हणाले आयुक्तांनी २०२५-२६ चे सुधारित व २०२६-२७ मूळ अर्थसंकल्प मंजुरी करिता सादर केला. २०२५ - २०२६ चे १.११७ कोटी ५२ लाख ५४ हजारांचा सुधारित अर्थसंकल्प व २०२६ - २०२७ चे ७३ लाख ९६ हजार शिलकीचा १,१७९ कोटी १० लाख ९७ हजार रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला.

पाणीपुरवठ्यासाठी १०५ कोटींची तरतूद

महिला व बालकल्याण, दुर्बल घटक कल्याण व दिव्यांग कल्याण या तीन विभागांसाठी मूळ अर्थसंकल्पातून महसुली उत्पन्नातून बांधीव खर्च वजा करून उर्वरित उत्पन्नाच्या ५ टक्के नुसार ३ कोटी २६ लाख ४० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
 
अर्थसंकल्पात उत्पन्न कमी व खर्च अधिक असल्याने पाणीपुरवठ्यासाठी १०५ कोटी १४ लाख ९१ हजार तर शिक्षण विभागासाठी ७६ कोटी ११ लाख २६ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसंकल्पात विविध विभागांतर्गत तरतूद केली असल्याचे आयुक्तांनी सभेनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

 

Web Title : भिवंडी महानगरपालिका का ₹1,179 करोड़ का बजट; कुछ पार्षद ही उपस्थित।

Web Summary : भिवंडी महानगरपालिका आयुक्त ने 2026-27 के लिए ₹1,179 करोड़ का बजट पेश किया। जलापूर्ति के लिए ₹105 करोड़ और शिक्षा के लिए ₹76 करोड़ आवंटित किए गए। विशेष बैठक कुछ पार्षदों के साथ स्थगित, आगे चर्चा की योजना है।

Web Title : Bhiwandi Municipal Corporation Announces ₹1,179 Crore Budget; Few Councilors Attend.

Web Summary : Bhiwandi Municipal Corporation's Commissioner presented a ₹1,179 crore budget for 2026-27. Water supply gets ₹105 crore. Education gets ₹76 crore. A special meeting with few corporators was adjourned, with further discussion planned.