गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा हिप्परगा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 20:34 IST2021-09-19T20:34:12+5:302021-09-19T20:34:43+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा हिप्परगा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू
सोलापूर : गणपती विसर्जनासाठी हिप्परगा तलाव येथे गेलेला लोभा मास्तर चाळीतील एका तरुणाचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
या घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. मयत तरुणाचे नाव विक्रम मस्के असल्याचे पोलिसांनी सांगितले.