देवदर्शनासाठी गेलेल्या सोलापूरच्या महिला भाविकाचा जोतिबा डोंगरावर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 17:28 IST2021-02-08T17:28:37+5:302021-02-08T17:28:42+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

A woman devotee from Solapur who went for Devdarshan died on Jotiba hill | देवदर्शनासाठी गेलेल्या सोलापूरच्या महिला भाविकाचा जोतिबा डोंगरावर मृत्यू

देवदर्शनासाठी गेलेल्या सोलापूरच्या महिला भाविकाचा जोतिबा डोंगरावर मृत्यू

सोलापूर/ कोल्हापूर : जोतिबा डोंगर (वाडी रत्नागिरी) येथे देवदर्शनासाठी आलेल्या सोलापूर जिल्ह्यातील महिला भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. दीपाली जग्नाथ मदने (वय २६, रा. पानीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे या महिला भाविकाचे नाव आहे. 

दरम्यान,  रविवारी दुपारी त्या सहकुटुंब जोतिबा डोंगरावर आल्या होत्या. सायंकाळी श्री ज्योतिर्लिंग देवदर्शन केल्यानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले, त्यानंतर चक्कर आली. त्यांना तातडीने उपचारासाठी कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.

 

 

Web Title: A woman devotee from Solapur who went for Devdarshan died on Jotiba hill