लस घेतली अन् जिंकला फ्रीज, गतीमान लसीकरणासाठी भन्नाट आयडिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 13:29 IST2021-12-14T13:27:54+5:302021-12-14T13:29:02+5:30
लसीकरण आणि लकी ड्रॉच्या स्पर्धेत रौफ कुरेशी या नशिबवान ठरल्या असून त्यांनी प्रथम क्रमांकाचे फ्रीज हे बक्षीस जिंकले. तर, पूजा माने यांना द्वितीय क्रमांकाचा एलईडी टीव्ही भेट मिळाला

लस घेतली अन् जिंकला फ्रीज, गतीमान लसीकरणासाठी भन्नाट आयडिया
सोलापूर - राज्य सरकारने लसीकरण मोहिम गतीमान करण्यासाठी सहज आणि मोफत लस उपलब्ध करुन दिली आहे. लस घेण्यासाठी रांगाच रांगा लागल्याचे आपण पाहिले आहे. मात्र, आता सहज लस उपलब्ध असल्याने नागरिकांना याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते. त्यामुळेच, या नागरिकांना लस घेण्यासाठी आकर्षित करण्यासाठी मोहोळ पत्रकार संघाने लसीकरण आणि लकी ड्रॉचे आयोजन केले होते. 4 दिवस चाललेल्या या लकी ड्रॉ स्पर्धेत एकूण 1585 जणांनी लस टोचली. रविवारी या स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
लसीकरण आणि लकी ड्रॉच्या स्पर्धेत रौफ कुरेशी या नशिबवान ठरल्या असून त्यांनी प्रथम क्रमांकाचे फ्रीज हे बक्षीस जिंकले. तर, पूजा माने यांना द्वितीय क्रमांकाचा एलईडी टीव्ही भेट मिळाला. सिद्धनागेश फर्निचर व मोहोळ तालुका पत्रकार संघाच्या वतीने या शिबिराचे आयोजन केले होते. पोलीस निरीक्षक अशोक सायकर, वैद्यकीय अधीक्षक प्रल्हाद गायकवाड, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला. यासाठी तहसीलदार प्रशांत बेडसे-पाटील, गटविकास अधिकारी गणेश मोरे, मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके, तालुका आरोग्य अधिकारी अरुण पाथरुटकर, डॉ. वाय. जे. जगताप यांनी परिश्रम घेतले.
यावेळी उद्योजक राजेश महामुरे, नागेश महामुरे, योगेश महामुरे, प्रशांत पवार, अशोक पाचकुडवे, आरोग्यसेविका रुकसाना खान, ज्योती अष्टुळ, मैना पाटील, प्रगती लोंढे, सुषमा सोनी, सीमा टेकळे, मोनिका कारंडे, अनंतकर, राजाभाऊ अष्टूळ आदींसह आरोग्य विभागाचे कर्मचारी कार्यकर्ते उपस्थित होते.
लकी ड्रॉमधील विजेते
रौफ कुरेशी (प्रथम बक्षीस : फ्रीज), पूजा माने, (द्वितीय एलईडी टीव्ही), विजयबाई आवताडे (तृतीय, आटा चक्की), दादा मुजावर, शुभम कोल्हाळ, राजू खरात, खंडू कापुरे, जमुना सोमनाथ जगताप,(चतुर्थ मिक्सर ग्रायंडर ५ बक्षिसे) सुमैय्या कुरेशी, पंकज वाघमारे,कोमल भोसले, गणेश उत्तम राऊत, श्वेता शिवाजी बनसोडे,(पाचवे प्रेशर कुकर पाच बक्षिसे)