अकलूजजवळ दुचाकी व कंटेनरचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 14:47 IST2021-08-19T14:42:52+5:302021-08-19T14:47:53+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

अकलूजजवळ दुचाकी व कंटेनरचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू
सोलापूर - अकलूज-वेळापूर रस्त्यावर झालेल्या दुचाकी व कंटेनरच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा अपघात नेमका कसा झाला ? याबाबतची माहिती अद्याप समजू शकली नाही.