कामतीजवळ दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक; तिघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 18:01 IST2021-11-27T18:01:29+5:302021-11-27T18:01:51+5:30
जखमी ॲम्बुलन्स अभावी एक तास विव्हळले; शेवटी खाजगी वाहन मिळाले

कामतीजवळ दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक; तिघे गंभीर जखमी
कामती : मोहोळ तालुक्यातील कामती बुद्रुक येथे दोन मोटार सायकलचा समोरासमोर अपघात होऊन तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात सुहास आसबे (वय २३), सुरज कोळी (वय २४ दोघे रा.मंगळवेढा) व परशुराम वाघमारे (वय ३० वर्ष रा.वाघोलीवाडी ता.मोहोळ) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत.
अपघाताची हकीकत अशी की, मंगळवेढ्याहून सोलापूरच्या दिशेने सुहास आसबे व सुरज कोळी हे एम एच १३ डीएस ११९६ या मोटरसायकवरून जात होते. हे दोघे युवक कामती बु. येथे आले असता सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या एमएच १३ बीएच ३२७० वरील चालक परशुराम वाघमारे यांच्यात जोराची धडक झाली.
या अपघात तिघेही गंभीर जखमी झाले असून यांना दवाखान्यात पोचवण्यासाठी ॲम्बुलन्स एक तास मिळाली नाही. जखमी युवक जिवाच्या आकांताने विव्हळत होते. शेवटी खाजगी गाडीतून त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे हलवण्यात आले आहे. कामती पोलीस ठाण्याचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते.