टिपर-दुचाकीच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू; वेळापूरजवळील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 13:27 IST2020-11-30T13:26:11+5:302020-11-30T13:27:13+5:30
संबंधितांवर कारवाईच्या मागणीसाठी नातेवाईकांचा पंढरपूर-पुणे महामार्गावर रास्ता रोको

टिपर-दुचाकीच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू; वेळापूरजवळील घटना
वेळापूर : वेळापूर (ता. माळशिरस) येथील उघडेवाडी चौकात पुणे - पंढरपूर रोडचे काम करत असलेल्या टिपरचा व मोटरसायकलची धडक झाली. या धडकेत दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली.
दरम्यान, तुषार शहाजी जाधव (वय १८) देवा बाबासाहेब माने (वय २८) हे दोघे ठार झाले तर धनंजय संजय माने (वय १७) हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच मयताच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पुणे-पंढरपूर रोडवर रास्का रोको आंदोलन केले.