टेम्पो अन् पिकअपची समोरासमोर धडक; दोन जण जागीच ठार, सांगोल्याजवळील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 12:37 IST2021-07-04T12:34:30+5:302021-07-04T12:37:22+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

The tempo and pickup hitting face to face; Two killed on the spot, incident near Sangola | टेम्पो अन् पिकअपची समोरासमोर धडक; दोन जण जागीच ठार, सांगोल्याजवळील घटना

टेम्पो अन् पिकअपची समोरासमोर धडक; दोन जण जागीच ठार, सांगोल्याजवळील घटना

सांगोला :  भरधाव टेम्पो व पिकअपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन ठार तर एकजण जखमी झाला. हा अपघात रविवारी सकाळी ९ च्या सुमारास सांगोला - पंढरपूर रोडवरील फॅबटेक कॉलेजसमोर घडला. अपघातातील जखमी व मृतांची नावे समजू शकली नाहीत.


पंढरपूरकडून टेम्पो क्र. एम .एच -२० सीटी - ९१०५ हा सांगोलाकडे भरधाव वेगाने निघाला होता तर सांगोल्याकडून पिकअप क्र. एम एच १०- सीएम-१२३० हा पंढरपूरकडे निघाला होता. दोन्ही वाहने फॅबटेक कॉलेजसमोर येताच समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक माने, पोलीस नाईक तुकाराम व्हरे, पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत सावंत, होमगार्ड यांनी अपघातस्थळी धाव घेऊन रस्त्यावरील दोन्ही वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. या अपघाताविषयी सांगोला पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते.

Web Title: The tempo and pickup hitting face to face; Two killed on the spot, incident near Sangola