Suspected murder of a young man who escaped from the Navy | पुण्यात नोकरी करणाºया तरूणाचा लऊळगावात संशयास्पद खून

पुण्यात नोकरी करणाºया तरूणाचा लऊळगावात संशयास्पद खून

ठळक मुद्दे- खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट, पोलीस तपास सुरू- कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू- लऊळ गावावर शोककळा, गावातील दुकाने बंद

कुर्डूवाडी : लऊळ (ता. माढा) येथे शुक्रवारी रात्री उशीरा साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात कारणावरून  तरुणाचा खून झाल्याची घटना घडली़ राजाराम शिवाजी घुगे ( वय ३०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबत कुर्डूवाडी पोलिसांनी संतोष खंडू गोरे ( वय ३८) व खंडू सुखदेव गोरे ( वय ७०) या संशियत दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मृत राजाराम घुगेचे कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून शनिवारी दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांचे पथक करीत आहे. त्याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या सुरू आहे.

Web Title: Suspected murder of a young man who escaped from the Navy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.