लऊळमध्ये कर्जाला कंटाळून लाकूड व्यापाºयाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 15:33 IST2020-01-18T15:32:24+5:302020-01-18T15:33:15+5:30
रेल्वे गेटजवळील चिंचेच्या झाडाला घेतली गळफास

लऊळमध्ये कर्जाला कंटाळून लाकूड व्यापाºयाची आत्महत्या
कुर्डुवाडी : माढा तालुक्यातील लऊळ येथील लाकडाचे व्यापारी चतुर्भुज सिताराम जानराव ( वय ५५ ) यांनी कर्जास कंटाळून शनिवारी पहाटे सहाच्या दरम्यान रेल्वे गेटजवळील एका चिंचेच्या झाडाला लटकून आत्महत्या केली आहे. त्यामुळे गावात शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लऊळ येथील चतुर्भुज जानराव हे लाकडाचे व्यापारी होते. त्यांच्याकडे खाजगी व बँकेचे काही कर्ज होते, त्याला कंटाळून त्यांनी शनिवारी पहाटे आत्महत्या केली आहे अशी ग्रामस्थांतुन चर्चा आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार विवाहित मुली, एक अविवाहित मुलगा असा परिवार आहे. त्यांच्यावर कुर्डुवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून लऊळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.