थांबलेल्या कंटेनरला एसटी बसची धडक; १५ प्रवासी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 08:02 IST2021-10-25T07:53:57+5:302021-10-25T08:02:48+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

थांबलेल्या कंटेनरला एसटी बसची धडक; १५ प्रवासी गंभीर जखमी
सोलापूर : भरधाव वेगात निघालेल्या पुणे - उमरगा राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बस व कंटेनरचा चिखलीजवळ अपघात झाला. या अपघातात प्राथमिक माहितीनुसार दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाले असून वाहक कांबळे हे गंभीर जखमी झाले आहेत.
राज्य परिवहन महामंडळाची एस-टी बस रात्री पुण्याहून उमरगा कडे मार्गस्थ झाली होती, दरम्यान पहाटे तीनच्या सुमारास रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरला भरधाव वेगात निघालेल्या बसने धडक दिली. या धडकेत एसटी बस चक्काचूर झाली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्गावरील पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.