बार्शी तालुक्यात सभापतीने केला गोळीबार; आरटीआय कार्यकर्त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 12:14 IST2021-06-29T12:12:58+5:302021-06-29T12:14:11+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

बार्शी तालुक्यात सभापतीने केला गोळीबार; आरटीआय कार्यकर्त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न
सोलापूर - बार्शी तालुक्यातील ज्योतिबाची वाडी जवळगाव क्रमांक 2 येथे आरटीआय (माहिती अधिकार) कार्यकर्त्यास अश्लिल भाषेत शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली. तो पळून जात असताना पंचायत समितीचे सभापतींनी गोळीबार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वैराग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पंचायत समितीचे विद्यमान सभापती अनील डिसले यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून प्रमोद गणपत ढेंगळे यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना 23 जून रोजी सकाळी दहाच्या दरम्यान ढेंगळे बसस्थानकावरुन घरी जात असताना घडली. वैराग पोलिसांनी मंगळवारी बारा वाजून चार मिनिटांनी जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल केला आहे.