Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 16:26 IST2025-12-27T16:24:29+5:302025-12-27T16:26:19+5:30
कोल्हापूरनंतर काँग्रेसने सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात २० उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
Solapur Municipal Election Congress Candidates list: सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी काँग्रेसने शनिवारी जाहीर केली. पहिल्या यादीत २० उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. यात माजी महापौर, शहराध्यक्ष, माजी नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी काँग्रेसने कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी ४८ उमेदवार जाहीर केले.
सोलापूर महापालिकेच्या १०२ जागांसाठी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोलापूरमध्ये भाजपाकडून आधी उमेदवारांची घोषणा केली जाईल, अशी चर्चा होती. मात्र काँग्रेसने पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली.
काँग्रेसने १० प्रभागांमधून २० उमेदवार जाहीर केले आहेत. शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांची सून सीमा यलगुलवार, माजी महापौर आरिफ शेख यांच्या कन्या सबा परवीन शेख, माजी महापौर संजय हेमगड्डी यांचा उमेदवारांमध्ये समावेश आहे.
प्रभाग - उमेदवाराचे नाव
९ अ) - दत्तु नागप्पा बंदपट्टे
११ ड) - धोंडप्पा गोविंदप्पा तोरणगी
१४ ब) - शोएब अनिसुर रहेमान महागामी
१५ ब) - सबा परवीन आरिफ शेख
१४ ड) - बागवान खलिफा नसीम अहमद बशीर अहमद
१५ क) - चेतन पंडित नरोटे
१५ ड) - मनिष नितीन व्यवहारे
१६ ब) - फिरदौस मौलाली पटेल
१७ अ) - सौ. शुभांगी विश्वजीत लिंगराज
१६ क) - सौ. सीमा मनोज यलगुलवार
१७ ब) - परशुराम छोटूसिंग सतारेवाले
१६ ड) - नरसिंग नरसप्पा कोळी
१७ ड) - वहिद अब्दुल गफूर बिजापूरे
२० अ) - सौ. अनुराधा सुधाकर काटकर
२१ अ) - प्रतीक्षा प्रवीण निकाळजे
२२ अ) - संजय चन्नवीरप्पा हेगड्डी
२१ क) - सौ. किरण शितलकुमार टेकाळे
२२ क) - सौ. राजनंदा गणेश डोंगरे
२१ ड) - रियाज इब्राहिम हुंडेकरी
२३ ब) - सौ. दिपाली सागर शहा