पैसे वाटप करताना भाजप उमेदवाराच्या मुलास काँग्रेसच्या उमेदवाराने पकडले

By आप्पासाहेब पाटील | Updated: January 14, 2026 13:32 IST2026-01-14T13:30:55+5:302026-01-14T13:32:00+5:30

Solapur Municipal Corporation Election: सोलापूर महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग २२ मध्ये भाजप उमेदवार अंबिका नागेश गायकवाड यांचे चिरंजीव प्रेम नागेश गायकवाड व मोहित गायकवाड यांना काँग्रेस उमेदवार कुणाल गायकवाड यांनी पैसे वाटप करताना रंगेहात पकडले.

Solapur Municipal Corporation Election: Congress candidate catches BJP candidate's son while distributing money | पैसे वाटप करताना भाजप उमेदवाराच्या मुलास काँग्रेसच्या उमेदवाराने पकडले

पैसे वाटप करताना भाजप उमेदवाराच्या मुलास काँग्रेसच्या उमेदवाराने पकडले

- आप्पासाहेब पाटील

सोलापूर - महानगरपालिका निवडणूक : प्रभाग २२ मध्ये भाजप उमेदवार अंबिका नागेश गायकवाड यांचे चिरंजीव प्रेम नागेश गायकवाड व मोहित गायकवाड यांना काँग्रेस उमेदवार कुणाल गायकवाड यांनी पैसे वाटप करताना रंगेहात पकडले.

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मध्ये निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आज दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी आला आहे. भाजपच्या उमेदवार अंबिका नागेश गायकवाड यांचे चिरंजीव प्रेम नागेश गायकवाड आणि मोहित गुरुदत्त गायकवाड हे मतदारांना मोदी हुडको येथे पैसे वाटप करत असताना प्रभाग २२ मधील काँग्रेसचे उमेदवार कुणाल गायकवाड यांनी त्यांना रंगेहात पकडले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. निवडणूक काळात मतदारांना पैशांच्या माध्यमातून प्रभावित करण्याचा हा प्रकार लोकशाही मूल्यांना तडा देणारा असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच काँग्रेस कार्यकर्ते घटनास्थळी जमा झाले.

काँग्रेसचे उमेदवार कुणाल गायकवाड यांनी सदर प्रकाराची तात्काळ माहिती निवडणूक प्रशासन व पोलिसांना दिली असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. सत्ताधारी भाजपकडून पैसे वाटप करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Web Title : कांग्रेस उम्मीदवार ने भाजपा उम्मीदवार के बेटे को पैसे बांटते पकड़ा

Web Summary : सोलापुर में, कांग्रेस उम्मीदवार ने भाजपा उम्मीदवार के बेटों को मतदाताओं को पैसे बांटते हुए रंगे हाथों पकड़ा। चुनाव नियमों का उल्लंघन करने वाली इस घटना से आक्रोश फैल गया और वोट खरीदने के प्रयासों के आरोप लगे। अधिकारियों को सूचित कर दिया गया है और जांच जारी है।

Web Title : BJP Candidate's Son Caught Distributing Money by Congress Candidate

Web Summary : In Solapur, a BJP candidate's sons were caught red-handed by a Congress candidate while allegedly distributing money to voters. The incident, a violation of election rules, sparked outrage and accusations of vote-buying attempts. Authorities have been notified and an investigation is underway.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.