सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामींना आली भोवळ

By Appasaheb.patil | Updated: January 4, 2020 17:24 IST2020-01-04T17:21:21+5:302020-01-04T17:24:13+5:30

अक्कलकोट येथील कार्यक्रमात आली भोवळ; सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू

Solapur MP Jayadheshwara Mahaswamy came in confusion | सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामींना आली भोवळ

सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामींना आली भोवळ

ठळक मुद्देअक्कलकोट येथे रॅलीच्या समारोपप्रसंगी घडला प्रकारखासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांना भाषण करतेवेळी आलीसोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

सोलापूर : येथील संघ परिवार व समविचारी संघटनांतर्फे नागरिकत्व सुधारणा व नोंदणी कायद्याच्या समर्थनार्थ अक्कलकोट येथे भव्य पदयात्रा काढण्यात आली होती.  या पदयात्रेचा समारोपप्रसंगी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी भाषण करत होते. भाषण झाल्यावर त्यांना चक्कर आली, त्यांना तेथील खासगी दवाखान्यात उपचार करून पुढे सोलापूरला पाठविण्यात आले असून अश्विनी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती स्वीय सहाय्यक श्रीकांत माळगे यांनी दिली. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अक्कलकोट येथे श्रीमंत कमलाराजे चौक चौकातील प्रियदर्शनी संस्कृती भवन येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ रॅलीचा शुभारंभ करण्यात आला होता. ही रॅली अक्कलकोट शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. रॅलीनंतर प्रियदर्शनी सांस्कृतिक भवनात आयोजित कार्यक्रमात खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी बोलत होते . यावेळी अचानक त्यांना भोवळ आल्याने ते स्टेजवरच कोसळले. यानंतर तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Solapur MP Jayadheshwara Mahaswamy came in confusion