Solapur: निकालाआधीच पंढरपुरात शिंदे अन् मोहिते पाटलांच्या विजयाचे बॅनर 

By Appasaheb.patil | Published: June 3, 2024 03:22 PM2024-06-03T15:22:34+5:302024-06-03T15:22:46+5:30

Lok Sabha Election Result 2024: लोकसभेच्या माढा मतदार संघाच्या जागेबाबत अनेक ठिकाणी ग्रामस्थ नेत्यांनी आपआपल्या गटात पैजा लावल्या आहेत. आता त्याचा पुढचा भाग म्हणजे पंढरपुरात निकाला आधीच दोन महत्त्वाच्या चौकात काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवारांच्या विजयाचे डिजिटल फलक लावण्यात आले आहे. 

Solapur: Banner of victory of Shinde and Mohite Patal in Pandharpur even before the results  | Solapur: निकालाआधीच पंढरपुरात शिंदे अन् मोहिते पाटलांच्या विजयाचे बॅनर 

Solapur: निकालाआधीच पंढरपुरात शिंदे अन् मोहिते पाटलांच्या विजयाचे बॅनर 

पंढरपूर - लोकसभेच्या माढा मतदार संघाच्या जागेबाबत अनेक ठिकाणी ग्रामस्थ नेत्यांनी आपआपल्या गटात पैजा लावल्या आहेत. आता त्याचा पुढचा भाग म्हणजे पंढरपुरात निकाला आधीच दोन महत्त्वाच्या चौकात काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवारांच्या विजयाचे डिजिटल फलक लावण्यात आले आहे. 

दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान पार पडले. आता प्रत्येकाला उत्सुकता आहे ती ४ जून रोजीच्या निकालाची. मात्र त्यापूर्वीच माढा लोकसभा मतदारसंघात पैजा लागल्या आहेत. मोहिते पाटील समर्थकांनी माढ्यात तुतारीच वाजणार या आत्मविश्वासाने चक्क अकरा बुलेटच्या पैजेचा विडा ठेवला आहे. त्याच आत्मविश्वासाने पंढरपुरातही विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांचे कार्यकर्ते, संभाजी ब्रिगेडचे नेते किरण घाडगे यांनी स्वतःचा आणि सोलापूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार प्रणिती शिंदे व माढा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा फोटो टाकून खासदारपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा अशा मजकुराचा डिजिटल फलक पंढरपूर शहारातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व इंदिरा गांधी चौक येथे लावला आहे.

Web Title: Solapur: Banner of victory of Shinde and Mohite Patal in Pandharpur even before the results 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.