माळशिरस बस स्थानकासमोरील दुकानांना लागली आग; दहा ते बारा दुकाने जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 09:56 IST2021-03-28T09:55:37+5:302021-03-28T09:56:36+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Shops in front of Malshiras bus stand on fire; Burn ten to twelve shops | माळशिरस बस स्थानकासमोरील दुकानांना लागली आग; दहा ते बारा दुकाने जळून खाक

माळशिरस बस स्थानकासमोरील दुकानांना लागली आग; दहा ते बारा दुकाने जळून खाक

माळशिरस : माळशिरस शहरातील प्रमुख गर्दीचे ठिकाण असलेल्या माळशिरस बसस्थानकाच्या समोरील व मराठी शाळेला लगत असणाऱ्या दहा ते बारा दुकानांना रात्री अज्ञात कारणाने आग लागल्यामुळे जळून खाक झाली आहेत.


दरम्यान, यामध्ये दुकानदारांचे लाखो रुपयांचे साहित्य जळाली असून पहाटे अग्निशामन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले जात असून आसपास ज्या दुकानदारांनी दुकानातील साहित्य बाहेर सुरक्षितस्थळी हलविले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शनिवार व रविवारी दुकाने बंद आहेत, त्यामुळे शनिवारी पूर्ण दिवस दुकाने बंद होती मात्र रात्री उशिरा अचानक लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. सकाळी या परिसरात आग विझवण्यासाठी हालचालींना वेग आला होता.

Web Title: Shops in front of Malshiras bus stand on fire; Burn ten to twelve shops