धक्कादायक; दोघी बहिणींचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू; सांगोला तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 09:23 IST2020-10-21T09:23:24+5:302020-10-21T09:23:28+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

धक्कादायक; दोघी बहिणींचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू; सांगोला तालुक्यातील घटना
सांगोला : वझरे (तालुका सांगोला) अंतर्गत कोकरे वस्ती येथील दोघी बहिणींचा शेततळ्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोघींचेही मृतदेह तळ्यातून बाहेर काढले, आई डाळिंब तोडण्यास गेले असताना मुली शेततळ्यावर गेल्यावर पाय घसरून पडलेचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही घटना काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडल्याचे समजते. आई घरी कामावरुन आल्यानंतर मुली दिसून आले नाहीत, म्हणून शोधाशोध केली असता ही घटना उघडकीस आली.