धक्कादायक; कामतीत टेम्पोची चोरी अन् तोच टेम्पो चोरून नेताना शिंगोलीत झाला पलटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2021 09:06 IST2021-10-28T09:06:05+5:302021-10-28T09:06:36+5:30

वाहनाची चाके घेऊन चोर पसार

Shocking; Stealing the tempo in Kamat and stealing the tempo at the end turned upside down in Shingoli | धक्कादायक; कामतीत टेम्पोची चोरी अन् तोच टेम्पो चोरून नेताना शिंगोलीत झाला पलटी

धक्कादायक; कामतीत टेम्पोची चोरी अन् तोच टेम्पो चोरून नेताना शिंगोलीत झाला पलटी

कामती : मोहोळ तालुक्यातील कामती बुद्रुक येथे आज गुरुवारी पहाटे अडीच ते तीनच्या दरम्यान एका पिकअप वाहनाची चोरी अज्ञात चोरट्यांनी केली. चोरीचे वाहन घेऊन निघालेल्या चोरट्यांनी शिंगोली शिवारात हे वाहन पलटी केल्याने चोरट्याचा चोरीचा डाव फसला. परंतु पलटी झालेल्या वाहनाची स्टेपनिसह तीन चाके चोरट्यांनी पळविली आहेत.

प्रकार असा घडला की, पोलीस ठाणे असणारे कामती हे गाव बाजरपेठेचे गाव आहे. मध्यरात्री पर्यंत या गावात लोकांनाच वावर असतो, पण गुरुवारच्या पहाटे खाजाभाई बागवान यांचे केळीची वाहतूक करणारे पिकअप वाहन अंबाबाई मंदिराजवळ लावले होते. पहाटेच्या थंडीचा फायदा अज्ञात चोरट्यांनी पिकअपचा दरवाजा काढून, पिकअप घेऊन सोलापूरच्या दिशेने जात असताना शिंगोली शिवारात वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअप पलटी झाले.

चोरीचा डाव फसल्याचे लक्षात येतात या अज्ञात चोरट्यांनी या वाहनांची टायर काढून घेऊन पळ काढला. ही बाब स्थानिकांना कळताच कामती पोलीस ठाण्यास कळविण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले असून त्या अज्ञात चोरट्यांचा तपास घेण्याचे काम चालू आहे.

Web Title: Shocking; Stealing the tempo in Kamat and stealing the tempo at the end turned upside down in Shingoli