धक्कादायक; कुंभारीजवळ प्रवासी जीपचा अपघात; चार ते पाच जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2021 11:44 IST2021-11-16T11:44:04+5:302021-11-16T11:44:13+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Shocking; Passenger jeep accident near Kumbhari; Four to five people were killed | धक्कादायक; कुंभारीजवळ प्रवासी जीपचा अपघात; चार ते पाच जण ठार

धक्कादायक; कुंभारीजवळ प्रवासी जीपचा अपघात; चार ते पाच जण ठार

सोलापूर : स्वामी समर्थांचे दर्शन करून सोलापूरकडे येत असलेल्या प्रवासी जीपचा अपघात झाला. हा अपघात सोलापूर-अक्कलकोट रोडवरील कुंभारीजवळ झाला.  या अपघात चार ते पाच जण ठार झाले असून चार जण जखमी झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

अक्कलकोटहून सोलापूरकडे येणाऱ्या एमएच १३ एएक्स १२३७ या जीपचा पुढील टायर फुटल्याने सोलापूर - अक्कलकोट रोडवर कुंभारी येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर गाडी उलटली. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात तीन ते चार जण दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.  कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर, अक्कलकोट व गाणगापूर असा प्रवास करणाऱ्या व्यक्तींचा यात समावेश आहे. एकूण आठ प्रवाशांपैकी चार गंभीर जखमी व चारजणांचा मृत्यू झाल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. अपघातात जखमी झालेल्या लोकांना नागरिकांनी जवळच्या दवाखान्यात हलवले असून, वळसंग पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

Web Title: Shocking; Passenger jeep accident near Kumbhari; Four to five people were killed