धक्कादायक; बार्शीच्या क्वारंटाईन सेंटरमधून चार जण गेले पळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 12:03 IST2020-07-09T12:00:04+5:302020-07-09T12:03:39+5:30

हायरिस्कचे रुग्ण; ग्रामीण वैद्यकीय अधिकाºयांची पोलिसांकडे तक्रार 

Shocking; Four people escaped from Barshi's quarantine center | धक्कादायक; बार्शीच्या क्वारंटाईन सेंटरमधून चार जण गेले पळून

धक्कादायक; बार्शीच्या क्वारंटाईन सेंटरमधून चार जण गेले पळून

ठळक मुद्देगाडेगाव रोडवरील मुलींच्या वसतिगृहात कोविड सेंटर तयार केले कोरोनाच्या अनुषंगाने हायरिस्कचे रुग्ण क्वारंटाईन केलेवैद्यकीय अधिकाºयांच्या आदेशानुसार त्यांची तपासणी केली जाते़

बार्शी : गाडेगाव रोडवरील मुलींच्या वसतिगृहात कोविड सेंटरमधील रुग्णांची तपासणी करत असताना क्वारंटाईन केलेले चार जण पळून गेले़ त्यांनी कोविड-१९ चा संसर्ग पसरविण्याचे घातक कृत्य केल्याने पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अनिरुद्ध भुजबळ यांनी बुधवारी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार साथीच्या रोगप्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

गाडेगाव रोडवरील मुलींच्या वसतिगृहात कोविड सेंटर तयार केले आहे. तेथे कोरोनाच्या अनुषंगाने हायरिस्कचे रुग्ण क्वारंटाईन केले होते़ त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाºयांच्या आदेशानुसार त्यांची तपासणी केली जाते़ त्यानुसार ६ जुलै रोजी तक्रारदार अधिकारी तपासणी करताना हे चौघे आढळून आले नाहीत़ त्यामुळे त्यांनी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोलिसात तक्रार दिली.

Web Title: Shocking; Four people escaped from Barshi's quarantine center