Video: शॉकींग! चक्क नदीच्या पाण्यातूनच नेली अंत्ययात्रा, मन हेलावणाऱ्या घटनेचा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 01:56 PM2022-08-09T13:56:19+5:302022-08-09T14:34:35+5:30

मागील काही दिवसांपासून अक्कलकोट तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे हरणा नदीला मोठया प्रमाणात पाणी आले

Shocking! A funeral procession carried out through the water of the river itself, a mind-blowing video of solapur akkalkot | Video: शॉकींग! चक्क नदीच्या पाण्यातूनच नेली अंत्ययात्रा, मन हेलावणाऱ्या घटनेचा व्हिडिओ

Video: शॉकींग! चक्क नदीच्या पाण्यातूनच नेली अंत्ययात्रा, मन हेलावणाऱ्या घटनेचा व्हिडिओ

googlenewsNext

आप्पासाहेब पाटील

सोलापूर - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावाजवळून जाणाऱ्या हरणा नदीतील विदारक दृश्य मंगळवारी समोर आले. नदीच्या पाण्यातून अंत्ययात्रा घेऊन जातानाची मनाला चटका देणारी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे. तसेच, मरणानंतरही खडतर प्रवास करण्याची वेळ प्रशासनाच्या उदासिनतेमुळे आल्याची लोकभावना व्यक्त होत आहे. 

मागील काही दिवसांपासून अक्कलकोट तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे हरणा नदीला मोठया प्रमाणात पाणी आले असून या पाण्यामुळे अनेक गावातील पाणी शिरले आहे. हरणा नदीच्या परिसरात पितापूर हे गाव आहे. या गावात मुस्लिम समाजातील एकाचे निधन झाले होते. गावातील मुस्लिम समाजाची स्मशानभूमी हरणा नदीच्या पलीकडे आहे. अंत्ययात्रा कशी घेऊन जायाची याबाबत ग्रामस्थांनी सुरूवातीला विविध उपाययोजना आखल्या. मात्र, पाण्यातून जाण्याशिवाय कोणताच पर्याय समोर आला नाही. शेवटी ग्रामस्थांनी थेट नदीच्या पाण्यातून अंत्ययात्रा नेऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. 

हरणा नदीवर पूल नसल्याने नागरिकांना अंत्यविधीसाठी अशा प्रकारची अडचण येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी ग्रामस्थांची मागणी आहे, परंतु प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे, सध्या हरणा नदीला पूर आल्याने अंत्यविधीसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे त्या वेळेचे हे दृश्य आहे आणि आज सकाळी हा व्हिडिओ टिपला आहे.

Web Title: Shocking! A funeral procession carried out through the water of the river itself, a mind-blowing video of solapur akkalkot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.