सोलापुरात शिंदेसेनेचा ४२ जागांचा प्रस्ताव, युतीची झाली बैठक; पहिल्यांदा सौम्य, नंतर गरमागरम चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 11:33 IST2025-12-26T11:25:38+5:302025-12-26T11:33:09+5:30
शिंदेसेनेचा ४२ जागांचा प्रस्ताव; पालकमंत्री

सोलापुरात शिंदेसेनेचा ४२ जागांचा प्रस्ताव, युतीची झाली बैठक; पहिल्यांदा सौम्य, नंतर गरमागरम चर्चा
सोलापूर : महापालिका निवडणुकीतील जागावाटपावर चर्चा करण्यासाठी भाजप आणि शिंदेसेनेच्या नेत्यांची पहिली बैठक गुरुवारी झाली. या बैठकीत शिंदेसेनेचे संपर्कप्रमुख संजय कदम यांनी ४२ जागांची मागणी केली. इतक्या जागा शक्य नाही; पण यावर तीन आमदारांसोबत चर्चा करून कळवितो, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
होटगी रोडवरील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीला माजी आमदार दिलीप माने, शिंदेसेनेचे नेते, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, महेश साठे, अमर पाटील, सचिन चव्हाण आणि भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आदी उपस्थित होते.
बांगलादेशात अमृत मंडलची हत्या हिंदू असल्याने झाली नाही; युनूस सरकारने त्यांना गुंड म्हटले
विधानसभा निवडणुकीत भाजपच्या शहराध्यक्षांनी मनपा निवडणुकीत २५ टक्के जागा देण्याचा शब्द दिला होता. हा निरोप १०२ जागा लढण्याचा शिंदेसेनेच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागावाटपावर शुक्रवारी पुन्हा चर्चा होणार आहे. भाजप आमदारांची भूमिका पाहता सर्व २६ प्रभागांतील प्रमुख उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी ठेवा, असा निरोप पाठविण्यात आला आहे. त्यानुसार शुक्रवारपासून अर्ज दाखल होण्याची चिन्हे आहेत.
शब्द पाळायला हवा. प्रत्येक प्रभागातून एक यानुसार २६ आणि निवडून येण्याच्या निकषावर इतर प्रभागांत १६ जागा द्याव्यात, अशी मागणी केली. भाजपचे शहरात तीन आमदार आहेत. पक्षाकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे व्यावहारिक पद्धतीने जागा वाटप व्हायला हवे, असे भाजप नेत्यांनी सांगितले.
सुरुवातीला शांततेत चाललेली ही बैठक नंतर गरमागरम झाली. आमदारांशी बोलून कळवितो, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
महायुतीच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी आयोजित बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमवेत रोहिणी तडवळकर, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, दिलीप माने, अमोल शिंदे, अमर पाटील, सचिन चव्हाण आदी.
बार्शीत लढलो असतो तर नगरपालिका निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. पक्षाची ताकद वाढत असल्याचे पालकमंत्री गोरे म्हणाले. त्यावर बार्शीमध्ये आमच्या पक्षाने भाजपला मदत केली. ही मदत केली नसती तर बार्शीचा निकाल वेगळा असता. सोलापुरात युती न झाल्यास इतर पक्षांना फायदा होईल. त्यामुळे युतीचा विचार करा, असे शिंदेसेनेचे नेते म्हणाले.
शिवसैनिक भाजपचे आमदार निवडून आणू शकतात. तर ते काहीही करू शकतात, हे लक्षात घ्यायला हवे. आम्ही सन्मानाने लोकसभा, विधानसभेला त्यांचे काम केले. आता त्यांना आमची कदर नसेल तर एकट्याने लढायला तयार आहोत.
अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख, शिंदेसेना