मोहोळ तालुक्यात वंचित आघाडीने घेतलेली मते राष्ट्रवादीसाठी विचारप्रवर्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 01:11 PM2019-05-25T13:11:23+5:302019-05-25T13:14:16+5:30

सोलापूर लोकसभा निवडणुक विश्लेषण; आगामी विधानसभेला ही आकडेवारी राष्ट्रवादीला विचार करायला लावणारी आहे.

Opinions by the Leader of the Nation in Mohol Taluka | मोहोळ तालुक्यात वंचित आघाडीने घेतलेली मते राष्ट्रवादीसाठी विचारप्रवर्तक

मोहोळ तालुक्यात वंचित आघाडीने घेतलेली मते राष्ट्रवादीसाठी विचारप्रवर्तक

Next
ठळक मुद्देअनगरमध्ये भाजपचे जयसिद्धेश्वर महास्वामी यांना ७२ मते मिळाली, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना ४ हजार ६४१ मते मिळालीशेटफळमधून भाजपचे जयसिद्धेश्वर महास्वामींना १ हजार ५७६ मते मिळाली, सुशीलकुमार शिंदे यांना ९२७ मते मिळाली तर प्रकाश आंबेडकर यांना २९५ मते मिळाली.

अशोक कांबळे

मोहोळ : नुकत्याच पार पडलेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यासह देशात उसळलेल्या मोदी लाटेमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे जयसिद्धेश्वर महास्वामी यांना सर्व विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आघाडी मिळाली. परंतु मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे यांना १५ हजार ४२९ मतांची आघाडी देण्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यशस्वी झाले आहेत. असे असले तरी तालुक्यात नव्यानेच स्थापन झालेल्या बहुजन वंचित आघाडीने मोहोळ विधानसभा मतदारसंघातून घेतलेली ३० हजार १४५ मते पाहता आगामी विधानसभेला ही आकडेवारी राष्ट्रवादीला विचार करायला लावणारी आहे.
मोहोळ तालुक्यातून भाजप आणि काँग्रेसला मिळून एक लाख ११ हजार ३६८ मतदान झाले होते. त्यापैकी ५१ हजार  ३३९ मते भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर महास्वामी यांना मिळाली, तर सुशीलकुमार शिंदे यांना ६० हजार ४५ मते मिळाली. 

मोहोळ तालुक्यातून ८ हजार ७१६ मतांची आघाडी शिंदे यांना मिळाली. पंढरपूर तालुक्यातून ६ हजार ४७९ तर उत्तर सोलापूर तालुक्यातून २३४ मतांची आघाडी असे मिळून मोहोळ विधानसभा मतदारसंघातून १५ हजार ४२९ मतांची आघाडी सुशीलकुमार शिंदे यांना मिळाली.

मोहोळ शहरातून भाजपचे जयसिद्धेश्वर महास्वामींना ४ हजार ८०९ मते मिळाली, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना ४ हजार ७७९ मते मिळाली तर प्रकाश आंबेडकर यांना २ हजार ९ मते मिळाली. शहरातून २१३ मतांची भाजपला आघाडी मिळाली.

शेटफळमधून भाजपचे जयसिद्धेश्वर महास्वामींना १ हजार ५७६ मते मिळाली, सुशीलकुमार शिंदे यांना ९२७ मते मिळाली तर प्रकाश आंबेडकर यांना २९५ मते मिळाली. शेटफळमधून ६३९ मतांची भाजपला लीड मिळाली.

अनगरमध्ये भाजपचे जयसिद्धेश्वर महास्वामी यांना ७२ मते मिळाली, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना ४ हजार ६४१ मते मिळाली तर वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना ३३७ मते मिळाली आहेत. हा आकडेवारी लक्षात घेता राष्टÑवादीला भविष्यात योजकपणे पावले टाकावी लागणार आहेत.

सुशीलकुमार शिंदे यांना आघाडी
भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर महास्वामी यांना सर्व ठिकाणी मोठी आघाडी मिळाली असून, केवळ मोहोळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना १५ हजार ४२९ मतांची आघाडी देत मोहोळ तालुक्यातून ८ हजार ७१६ मतांची आघाडी देत राष्टÑवादीची एकाकी खिंड राजन पाटील यांनी लढविली आहे.

Web Title: Opinions by the Leader of the Nation in Mohol Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.