राष्ट्रवादीची ‘उत्तम’ खेळी; जानकरांना माळशिरसमधून तिकीट

By Appasaheb.patil | Updated: October 3, 2019 12:04 IST2019-10-03T12:03:09+5:302019-10-03T12:04:51+5:30

भाजपाने पाठविले होते त्यांना फलटणला; माढ्यातून बबनदादा तर मोहोळमधून यशवंत माने यांना उमेदवारी

Nationalist 'best' play; Tickets from Janshir to Malsir | राष्ट्रवादीची ‘उत्तम’ खेळी; जानकरांना माळशिरसमधून तिकीट

राष्ट्रवादीची ‘उत्तम’ खेळी; जानकरांना माळशिरसमधून तिकीट

ठळक मुद्दे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुरूवारी विधानसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर- दुसºया यादीत राज्यातील १४ जिल्ह्यातील २० उमेदवारांचा समावेश-  राष्ट्रवादीने ‘उत्तम’ खेळी करीत जानकरांना माळशिरसमधून तिकीट जाहीर केले

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुरूवारी विधानसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली़ त्यात माळशिरसमधून उत्तमराव जानकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे़ दरम्यान, भाजपने उत्तम जानकर यांना फलटणमधून निवडणूक लढविण्यासाठी तयारी करण्याचे आदेश दिले होते, मात्र राष्ट्रवादीने ‘उत्तम’ खेळी करीत जानकरांना माळशिरसमधून तिकीट जाहीर करून नवा पलटवार केला आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरूवारी राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली़ त्यात १४ जिल्ह्यातील २० उमेदवारांचा समावेश आहे़ सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार बबनदादा शिंदे, मोहोळमधून यशवंत माने तर माळशिरसमधून उत्तमराव जानकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

 मागील काही दिवसांपासून माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे हे भाजपमधून निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, मात्र राष्ट्रवादीच्या यादीत त्यांचे नाव आल्याने भाजप प्रवेशाबाबत चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे.


 

Web Title: Nationalist 'best' play; Tickets from Janshir to Malsir