सांगोला तालुक्यात मोठी चोरी; ५१ तोळे सोन्याचे दागिने अन् एक लाखाची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 08:32 IST2021-04-03T08:31:12+5:302021-04-03T08:32:07+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Major theft in Sangola taluka; 51 ounces of gold jewelery and one lakh cash lamps | सांगोला तालुक्यात मोठी चोरी; ५१ तोळे सोन्याचे दागिने अन् एक लाखाची रोकड लंपास

सांगोला तालुक्यात मोठी चोरी; ५१ तोळे सोन्याचे दागिने अन् एक लाखाची रोकड लंपास

सांगोला : अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या खिडकीचे गज कटरने कापून आत प्रवेश केला, यावेळी चोरट्यांनी बेडरुमच्या कपाटाचे लॉक तोडून सुमारे १ लाखाची रोकड व ५१ तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे २७ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास महूद (ता. सांगोला) येथील अकलूज चौकातील शैलेश गांधी यांच्या बंगल्यात घडली. दरम्यान चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिसांनी श्वान पथकासह ठसे तज्ञांना पाचारण केले आहे.

महुद येथील शैलेश गांधी यांचे महूद दिघंची रोडवरील अकलूज चौकात शैलेश गारमेंट्स आणि निवासस्थान आहे. शुक्रवारी शैलेश गांधी यांनी रात्री दुकान बंद करून जेवण केल्यानंतर बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावर कुटुंबासह झोपले होते. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास चोरट्यांनी ग्राउंड फ्लोअरच्या खिडकीचे गज कटरने कापून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी बेडरूमच्या कपाटाचे लॉक तोडून ५१ तोळे सोन्याचे दागिने व रोख १ लाख रुपये घेवुन तेथून पोबारा केला.

पहाटे ४ च्या सुमारास शैलेश गांधी यांच्या पत्नीस जाग आली असता त्यांना बेडरुमच्या कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले, म्हणून त्यांनी पती शैलेश गांधी यांना झोपेतून उठवून घरात चोरी झाल्याचे सांगितले. घटनास्थळी पोलीस हेडकॉन्स्टेबल तानाजी लिंगडे भेट देऊन पाहणी केली आहे.

Web Title: Major theft in Sangola taluka; 51 ounces of gold jewelery and one lakh cash lamps