माढा लोकसभा निवडणुक निकाल २०१९ : सातव्या फेरीअखेर संजय शिंदे आघाडीवर...कोण जिंकणार माढा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 11:00 AM2019-05-23T11:00:55+5:302019-05-23T11:03:09+5:30

Madha Lok Sabha Election Results 2019

Madha Lok Sabha Election 2019 live result & winner: Ranjitsinh Naik Nimbalkar VS Sanjay Shinde Votes & Results | माढा लोकसभा निवडणुक निकाल २०१९ : सातव्या फेरीअखेर संजय शिंदे आघाडीवर...कोण जिंकणार माढा ?

माढा लोकसभा निवडणुक निकाल २०१९ : सातव्या फेरीअखेर संजय शिंदे आघाडीवर...कोण जिंकणार माढा ?

googlenewsNext
ठळक मुद्दे- माढा लोकसभा निवडणूक मतमोजणीला प्रारंभ- पोलीसांचा चोख पोलीस बंदोबस्त- फेरीनिहाय निकाल हाती देण्यास प्रशासन सज्ज

सोलापूर : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उसळलेल्या मोदीलाटेनं माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने पार वाट लावली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत याचा पराभव केला होता. यावेळी या मतदारसंघात राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यापुढे सदाभाऊ खोत याच्या रूपानं तगडं आव्हान उभं केलं आहे. यंदा भाजपचे रणजितसिंह नाईक -निंबाळकर, राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे व वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड़ विजयराव मोरे यांनी धडाकेबाज प्रचार करून जोरदार हवा केली आहे़ त्यामुळे इथल्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचं लक्ष लागलंय.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून माढा लोकसभा मतदारसंघात सातव्या फेरीनंतर राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना ८६ हजार १९० मतं मिळाली असून भाजपचे रणजिसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पारड्यात ८५ हजार ०८१ मतं पडली आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघात एकूण १२ लाख ११ हजार मतांची मतमोजणी होणार आहे़ कुणाला किती मतं मिळणार याकडे साºयाचे लक्ष लागले आहे़    

गेल्या निवडणुकीत स्वाभिमानी पक्षाचे सदाभाऊ खोत यांचा राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पराभव केला होता़ 


 

Web Title: Madha Lok Sabha Election 2019 live result & winner: Ranjitsinh Naik Nimbalkar VS Sanjay Shinde Votes & Results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.