Good News; एमपीएससी परीक्षेत करमाळ्याचा वैभव नवले राज्यात प्रथम
By Appasaheb.patil | Updated: March 17, 2020 17:39 IST2020-03-17T17:28:23+5:302020-03-17T17:39:32+5:30
लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर; साताºयाची दिपाली कोळेकर महिला गटात अव्वल

Good News; एमपीएससी परीक्षेत करमाळ्याचा वैभव नवले राज्यात प्रथम
सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) चा मंगळवारी दुपारी पीएसआय परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला़ या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहरात राहणारा वैभव नवले हा राज्यात प्रथम आला आहे. अहमदनगर येथील ज्ञानदेव काळे हा मागास प्रवर्गातून प्रथम आला आहे. सातारा जिल्ह्यातील दिपाली कोळेकर ही महिला गटात राज्यात प्रथम आली.
वैभव नवले हा मुळचा करमाळा शहरात राहतो़ त्याचे प्राथमिक शिक्षण करमाळा शाळा नंबर ३ येथे झाले़ पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण महात्मा गांधी विद्यालयात पूर्ण झाले़ त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले़ २०१६ साली झालेल्या पीएसआय परीक्षेत त्याला अपयश आले मात्र २०१८ साली घेण्यात आलेल्या पीएसआय परीक्षेत त्याने राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला.