SRPF जवानाने केला गोळीबार; एक ठार, दोघे जखमी; सोलापूर जिल्ह्यातील मोठी घटना
By Appasaheb.patil | Updated: October 21, 2021 09:00 IST2021-10-21T08:54:52+5:302021-10-21T09:00:14+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

SRPF जवानाने केला गोळीबार; एक ठार, दोघे जखमी; सोलापूर जिल्ह्यातील मोठी घटना
सोलापूर : पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील 'एसआरपीएफ' जवानाने गोळीबार केल्याची घटना भातंबरे (ता. बार्शी) येथे घडली.
या घटनेत एक जण जागीच ठार झाला असून दोघे जण जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री उशीरा घडली. याच घटनेत दोघांना गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची ही माहिती पोलिसांनी दिली.
नितीन बाबुराव भोसकर असे गोळीबारात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बालाजी महात्मे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती वैराग पोलिसांनी दिली.