धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी; भाजपच्या नाईक-निंबाळकरांनी घेतला आक्षेप

By बाळकृष्ण दोड्डी | Published: April 20, 2024 03:01 PM2024-04-20T15:01:09+5:302024-04-20T15:04:59+5:30

याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.

Errors in Affidavit of Dharisheel Mohite Patil BJP s Naik Nimbalkar objected lok sabha maharashtra 2024 | धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी; भाजपच्या नाईक-निंबाळकरांनी घेतला आक्षेप

धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी; भाजपच्या नाईक-निंबाळकरांनी घेतला आक्षेप

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रतिज्ञापत्रावर भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.

शनिवारी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू आहे. मोहिते-पाटील यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात व्यवसाय संबंधित कॉलम रिकामा सोडल्यामुळे त्यांचे प्रतिज्ञापत्र अपूर्ण असल्याचा आक्षेप नाईक-निंबाळकरांनी नोंदवला आहे. म्हणणे मांडण्यासाठी मोहिते-पाटील यांनी दोन तासांची वेळ मागितली. परंतु अधिकाऱ्यांनी त्यांना एका तासात म्हणणे सादर करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे आता पुढील सुनावणी तीन वाजता सुरू होणार आहे.

Web Title: Errors in Affidavit of Dharisheel Mohite Patil BJP s Naik Nimbalkar objected lok sabha maharashtra 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.