दारूच्या नशेत मामाने केला विवाहित भाचीचा विनयभंग; सांगोला तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 22:02 IST2020-07-01T21:59:40+5:302020-07-01T22:02:24+5:30

सांगोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल; जिवे ठार मारण्याचीही दिली धमकी

Drunken uncle molested married niece; Incidents in Sangola taluka | दारूच्या नशेत मामाने केला विवाहित भाचीचा विनयभंग; सांगोला तालुक्यातील घटना

दारूच्या नशेत मामाने केला विवाहित भाचीचा विनयभंग; सांगोला तालुक्यातील घटना

ठळक मुद्देपीडित विवाहित भाचीने दिली पोलिसात तक्रारमामाविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सांगोला : विवाहित भाची घरात एकटी असल्याची संधी साधून दारूच्या नशेतील मामाने तिच्या घरात घुसून  'तू मला खूप आवडतेस'  म्हणून तिला मिठ्ठी मारून तिचा विनयभंग केला. अचानक घडल्या प्रकारानंतर घाबरलेल्या भाचीने डोकेदुखीच्या गोळ्या घेतल्याने तिला अस्वस्थ वाटू लागले. ही घटना सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथे घडली आहे.

पीडित विवाहित भाची २८ जून रोजी दुपारच्या  सुमारास घरात एकटी असताना दारूच्या नशेतील मामाने तिच्या घरात घसून 'तू मला लई आवडते, माझे तुझ्यावर प्रेम असून तुझा नवरा आता दुसऱ्या बाई बरोबर पळून गेला आहे,  तू माझ्यासोबत राहा मी तुला सांभाळतो' असे म्हणून भाचीला मिठी मारून मनास लज्जा वाटेल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. 
दरम्यान, मामाने एवढ्यावरच न थांबता तू घडला प्रकार कोणाला सांगितला तर तुझे काही खरे नाही अशी धमकी देऊन घरातून निघून गेला. मामाने अचानक घरात घुसून असे कृत्य केल्यामुळे व त्याच्या धमकीमुळे भाचीने टेन्शनमध्ये डोकेदुखीच्या डिक्लो प्लस दोन गोळ्या घेतल्याने तिला अस्वस्थ वाटू लागले, नातेवाईकांनी तिला तात्काळ उपचाराकरिता दवाखान्यात दाखल केले. याबाबत पीडित भाचीने मामाविरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: Drunken uncle molested married niece; Incidents in Sangola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.