या कारणासाठी केली बार्शीतील डॉक्टराने आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 15:14 IST2020-08-28T15:11:44+5:302020-08-28T15:14:18+5:30

बार्शी : शहरातील एका डॉक्टरने स्वत:च्या बेडरुममधील पंख्यास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पंकज नानासाहेब आवारे (४०) असे गळफास ...

The doctor in Kelly Barshi committed suicide for this reason | या कारणासाठी केली बार्शीतील डॉक्टराने आत्महत्या

या कारणासाठी केली बार्शीतील डॉक्टराने आत्महत्या

ठळक मुद्देबार्शी येथील डॉ. पंकज नानासाहेब आवारे यांनी स्वत:च्या बेडरूममधील पंख्यास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीआत्महत्येचे नेमके कारण काय असावे, याबद्दल पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली आहे

बार्शी : शहरातील एका डॉक्टरने स्वत:च्या बेडरुममधील पंख्यास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पंकज नानासाहेब आवारे (४०) असे गळफास घेतलेल्या डॉक्टरचे नाव आहे.

बार्शी येथील डॉ. पंकज नानासाहेब आवारे यांनी स्वत:च्या बेडरूममधील पंख्यास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत त्यांचे मेव्हणे महारुद्र जाधव यांनी पोलिसात खबर दिली आहे. सकाळी सर्व जण उठल्यानंतर दार उघडले नाही. त्यामुळे दरवाजा तोडताच त्यांनी गळफास घेतल्याचे दिसले.

 त्यांनी आजपर्यंत येथील खासगी दवाखान्यात वैद्यकीय सेवा केली. तालुक्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देत असताना त्यांची बारामती येथील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन मुले असा परिवार आहे. त्याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. आत्महत्येचे नेमके कारण काय असावे, याबद्दल पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली आहे. त्या 
दृष्टीने तपास सुरु असल्याचे  सांगण्यात आले. मानसिक तणाव किंवा घरगुती कारणावरून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे़

Web Title: The doctor in Kelly Barshi committed suicide for this reason