चर्चा काँग्रेसची, मात्र आघाडी भाजपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:43 PM2019-05-25T12:43:50+5:302019-05-25T12:47:40+5:30

सोलापूर लोकसभा निवडणूक विश्लेषण; उत्तर सोलापूर तालुक्यातील १९ गावांतून काँग्रेसला तर १७ गावांतून भाजपला आघाडी असली तरी भाजपला ७०० मतांची आघाडी मिळाली आहे.

Discussion of Congress, but the lead BJP | चर्चा काँग्रेसची, मात्र आघाडी भाजपला

चर्चा काँग्रेसची, मात्र आघाडी भाजपला

Next
ठळक मुद्देउत्तर सोलापूर तालुक्यातील ३६ गावे तीन विधानसभा मतदारसंघात विभागली आहेत.पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या मतदारसंघातील कोंडी व खेड या दोन गावांत भाजपला ९२७ अधिक मते मिळालीसहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघातील हिरज, बेलाटी, डोणगाव व नंदूर-समशापूर या गावांतून भाजपला अधिक मते आहेत

अरूण बारसकर

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेसचे नेते व गावोगावचे कार्यकर्ते निवडणुकीसाठी सक्रिय राहिल्याने काँग्रेसला मताधिक्य मिळेल, अशी चर्चा होती; मात्र उत्तर सोलापूर तालुक्यातील मतदारांनी भाजपला साथ दिल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. तालुक्यातील १९ गावांतून काँग्रेस तर १७ गावांतून भाजपला आघाडी मिळाली असली तरी एकूणच भाजपला ७०० मतांची आघाडी मिळाली आहे. 

उत्तर सोलापूर तालुक्यातील ३६ गावे तीन विधानसभा मतदारसंघात विभागली आहेत. सर्वाधिक २४ गावे मोहोळ विधानसभा, कोंडी व खेड ही गावे शहर उत्तर तर सीना नदी काठची १० गावे सोलापूर दक्षिण मतदारसंघाला जोडली आहेत. पडसाळी, गावडीदारफळ, वडाळा, कळमण या गावांत काँग्रेस तर कौठाळी, बीबीदारफळ, अकोलेकाटी, तळेहिप्परगा, खेड, कोंडी व हगलूर या गावांतून भाजपला चांगले मताधिक्य मिळाले आहे.

पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या मतदारसंघातील कोंडी व खेड या दोन गावांत भाजपला ९२७ अधिक मते मिळाली आहेत. बीबीदारफळ पंचायत समितीमधील गुळवंचीत काँग्रेसला आघाडी मिळाली आहे. उर्वरित रानमसले, बीबीदारफळ, कोंडी,अकोलेकाटी व कारंबा या गावांतून भाजपला तब्बल १७३५ मतांची आघाडी तर नान्नज पंचायत समिती गणात २१५३ मते काँग्रेसला अधिक मिळाली आहेत. या गणात भाजपपेक्षा काँग्रेसला अधिक मते असली तरी नान्नजमध्ये काँग्रेसला अवघे ९० एवढेच मताधिक्य आहे.

कौठाळी,हगलूर व तळेहिप्परग्यातून प्रथमच भाजपला आघाडी मिळाली आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघातील हिरज, बेलाटी, डोणगाव व नंदूर-समशापूर या गावांतून भाजपला अधिक मते आहेत. मार्डीत भाजपला ५८ मते अधिक मिळाली तर पाकणीत काँग्रेसला ३४ मते अधिक मिळाली. भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी मार्डी गावावर पकड बसवली आहे़ मार्डी गणात भाजपला ५६५ तर तिºहे गणात ३५८ मतांची आघाडी मिळाली आहे.

सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत एकत्र आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीची मोट कायम राहावी यासाठी लोकसभा निवडणुकीसाठी तिºहे, वडाळा व सोलापूर येथे चार बैठका घेऊन काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सक्रिय केले. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने व राष्टÑवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष बळीरामकाका साठे यांनी मनावर घेऊन कार्यकर्ते कामाला लावले होते. त्यामुळे काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांना अधिक मते मिळतील असे चित्र होते. प्रत्यक्षात तालुक्यातून काँग्रेसपेक्षा भाजपला ७०० पेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाली.

‘वंचित’चा दिसतोय प्रभाव

  • -   वंचित बहुजन आघाडीच्या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना तालुक्यात ७ हजार मते मिळाली आहेत. अकोलेकाटी, वडाळा, बाणेगाव, कारंबा,  रानमसले, नान्नज, हिप्परग्यातून वंचितला चांगली मते मिळाली आहेत. 
  • -   शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी मनावर घेऊन कार्यकर्ते प्रचाराच्या कामाला लावले नाहीत किंवा यासाठी एखादी बैठकही घेतली नाही. 
  • -    सेना-भाजप नेत्यांनी एकत्रित प्रचार यंत्रणाही राबवली नाही. विधानसभा निवडणुकीत दुभागलेल्या भाजप- शिवसेना नेते व कार्यकर्त्यांत बाजार समितीच्या निवडणुकीत अधिक दरी पडली होती.ती लोकसभा निवडणुकीतही दिसून आली.

Web Title: Discussion of Congress, but the lead BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.