Demolition drive of Shiv Sena candidate in Unagar | अनगरमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचार गाडीची तोडफोड
अनगरमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचार गाडीची तोडफोड

ठळक मुद्दे- मोहोळ विधानसभा मतदारसंघातील अनगर येथे घडली घटना- घटनेनंतर संबंधित चालकांनी गाठले मोहोळ पोलीस ठाणे- शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून घटनेचा निषेध, संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाईची केली मागणी

सोलापूर : येथील मोहोळविधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांच्या प्रचार गाडीची अनगर (ता़ मोहोळ) येथे तोडफोड करण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.

दरम्यान, मोहोळ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, मोहोळ विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांच्या प्रचाराची गाडी अनगर भागात फिरत होती. त्यावेळी अनगर चौकातील खंडोबाची वाडी येथील चौकात काही अज्ञात लोकांनी येऊन प्रचार गाडीच्या चालकास मारहाण करून गाडीची तोडफोड केली.

याशिवाय प्रचार गाडीतील साऊंडचा आवाज का कमी करीत नाही असे म्हणून चालकास मारहाण केली. याचवेळी चालकाच्या खिशातील मोबाईल व सतराशे रूपये हिसकावून घेतल्याची माहिती समोर आली आहे असे सांगितले. याबाबत मोहोळ पोलीसात संबंधितांविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचेही पोलीसांनी सांगितले.

Web Title: Demolition drive of Shiv Sena candidate in Unagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.