Dancing out .... Inside meditation | बाहेर जल्लोष....आत ध्यानधारणा
बाहेर जल्लोष....आत ध्यानधारणा

ठळक मुद्दे- सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जयसिध्देश्वर महास्वामी विजयी- माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंचा झाला पराभव

सोलापूर : एरव्ही जगद्गुरू पंचाचार्य महाराज अन् शिवाचा जयजयकार अनुभवणाºया शेळगी येथील शिवयोग धामने गुरुवारी निवडणुकीच्या निकालानंतर भाजप-शिवसेनेचा जयजयकार अनुभवला. विशेष म्हणजे मठाबाहेर जल्लोष सुरू असताना डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी आतमध्ये मौन व्रतात ध्यानधारणा करत होते.

सकाळी महास्वामी भक्तांच्या घरातून पूजा आटोपून मठात दाखल झाले. त्यानंतर बाहेर भक्त अन् कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली. काही कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत, फटाके फोडून घोषणाबाजीला सुरुवात केली. महास्वामीही निकालाच्या उत्सुकतेने मौन न सोडता, फोनवर इतरांना बोलायला लावून अंदाज जाणून घेत होते.

अधून मधून उठून पूजागृहात जाऊन ते ध्यानधारणाही करायचे. समोर असलेल्या दूरदर्शन संचावरून देशाचा निकालही ऐकत होते. कार्यकर्त्यांना काही सांगण्याचा प्रसंग आला तर त्यांनी कागदावर लिहूनच आपले मत व्यक्त केले. महास्वामींच्या हातवाºयाचे संदेश गुरुबंधू मुखेड मठाचे मठाधिपती डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महास्वामी व त्यांचे सेवक मुनी भक्त व कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवत होते.


 


Web Title: Dancing out .... Inside meditation
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.