लऊळमधील महिलेच्या मृत्यूनंतर आला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 16:05 IST2020-06-05T16:04:24+5:302020-06-05T16:05:57+5:30
सोलापूर जिल्ह्यात आढळले पुन्हा तीन रुग्ण; माढा तालुक्यात कोरोना घुसला; जिल्हा आरोग्य विभाग सतर्क...!

लऊळमधील महिलेच्या मृत्यूनंतर आला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात कोरोना ने पुन्हा डोके वर काढले असून माढा तालुक्यातील लऊळ येथील महिलेच्या मृत्यूनंतर तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शुक्रवारी जिल्ह्यात तीन रुग्ण आढळले आहेत.
जिल्हा आरोग्य विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात शुक्रवारी तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लऊळ येथील एका महिलेला त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते या दरम्यान तिचा मृत्यू झाला तिचे स्वाब घेण्यात आले होते, त्यात ती पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे.
त्याचबरोबर बार्शी तालुक्यातील रातंजन व कुंभारी येथील घरकुल येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. बार्शी तालुका व कुंभारी येथील घरकुलमध्ये संसर्गातून रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले आहे. माढा तालुक्यात कोरोनाने पहिल्यांदाच शिरकाव केला आहे. येथे आरोग्य विभागाची पथके रवाना झाली .